• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /श्री चरणीची आयसीसीची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा मोडला रेकॅार्ड

श्री चरणीची आयसीसीची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा मोडला रेकॅार्ड

आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) महिला टी२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत, चरणीने असा विक्रम प्रस्थापित केला आहे जो यापूर्वी कोणत्याही गोलंदाजाने केलेला नाही.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Sep 29, 2026, 05:30 PM IST|Updated: Sep 29, 2026, 05:57 PM IST
joinshare
श्री चरणीची आयसीसीची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा मोडला रेकॅार्ड

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
काही तासात सुरु होणार WPL 2027 लिलाव! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार येणार Live Streaming?

काही तासात सुरु होणार WPL 2027 लिलाव! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार येणार Live Streaming?

2

भाजपाचा मोठा निर्णय! राज्यसभा पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट, 'या' नेत्याच्या नावाची घोषणा

3

महिलांनो सावधान! Online मागवलेली साडी Return करताच ₹99518 बँक बॅलेन्स ₹0 झाला; नेमकं तिच्यासोबत घडलं काय?

4

मीनाक्षी - राजेंद्र शिंदेंची चौकशी, सीसीटीव्ही फुटेज...; अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणाले, 'पुराव्याची सांगड घालून...' प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

5

मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूककोंडीचा फटका, 25 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारताची युवा स्टार क्रिकेट संघातील श्रीचर्णी हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी वयामध्ये खळबळ उडवली आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई खेळांमध्ये महिला क्रिकेट संघामध्ये श्री चरणीने कमालीची कामगिरी केली होती, आता तिच्या आशियाई खेळांमधील कामगिरीनंतर तिच्या नावावर नवा रेकॅार्ड प्रस्तापित झाला आहे. आयसीसीने नवी महिला गोलंदाजी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारताच्या युवा गोलंदाजाने आतंरराष्ट्रीय स्तरावर कमालीची कामगिरी केली आहे. आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) महिला टी२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत, चरणीने असा विक्रम प्रस्थापित केला आहे जो यापूर्वी कोणत्याही गोलंदाजाने केलेला नाही. ८१७ रेटिंग गुणांसह, ती महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीच्या इतिहासातील सर्वोच्च मानांकन असलेली गोलंदाज ठरली आहे.

भारताच्या संघाने आठव्यांदा आशिया कप जिंकला त्याचबरोबर टीम इंडियाने आशियाई खेळांमध्ये गोल्ड मेडल देखील नावावर केले. या दोन्ही स्पर्धेंमधील कामगिरीनंतर श्री चरणीने कमालीची कामगिरी केली याचा फायदा तिला आता आयसीसी रॅंकिंगमध्ये झाला आहे. दीप्ती शर्माच्या साथीने श्री चरणीने संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवले. चरणीने आशिया कपमध्ये १२ बळी घेतले, ज्यात श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यातील चार बळींचा समावेश आहे. तिने यावर्षी आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३९ बळी घेतले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेतही चरणीने उत्कृष्ट गोलंदाजी करत जपानविरुद्ध चार बळी घेतले होते. श्रीलंकेविरुद्ध दोन बळी घेऊन सुवर्णपदक जिंकण्यातही तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

श्री चरणीने ऑस्ट्रेलियाची स्टार गोलंदाज मेगन शटचा विक्रम मोडला आहे. शटने नोव्हेंबर २०१८ मध्ये आयसीसी महिला टी२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत ८०६ रेटिंग गुण मिळवले होते. चरणीचे सध्याचे रेटिंग तिच्यापेक्षा ११ गुणांनी जास्त आहे. २०२६ च्या ऐची-नागोया आशियाई खेळांमधील तिच्या प्रभावी कामगिरीनंतर , तिने आपल्या नावावर आणखी एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्री चरणीने आपल्या गोलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने १३ धावांत २ बळी घेतले. या सामन्यात भारताने श्रीलंकेला १४७ धावांनी हरवून सुवर्णपदक जिंकले.

चरणीच्या कामगिरीने केवळ भारताच्या विजयातच योगदान दिले नाही, तर तिची रँकिंगही नव्या उंचीवर नेली. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने तिने महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. गोलंदाजांच्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे वर्चस्व कायम आहे. दमदार कामगिरीसह दीप्ती शर्मा ७५४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाची सलामीवीर स्मृती मंधानाला टी-२० फलंदाजीच्या यादीत फायदा झाला असून, ती ७५४ गुणांसह अव्वल पाचमध्ये पोहोचली आहे. ती सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. मंधानाने आशियाई क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. शेफाली वर्मा तिच्या पुढे चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाची अनुभवी फलंदाज बेथ मूनी यादीत अव्वल स्थानी कायम आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Sports News