श्रेयस अय्यरने मोडला रोहित शर्माचा रेकॅार्ड, अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला कर्णधार!
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टी20 मालिकेचा चौथा सामना भारताने गमावला पण श्रेयस अय्यरने आता नवा रेकॅार्ड नावावर केला आहे आणि माजी कर्णधार रोहित शर्माचा रेकॅार्ड त्याने मोडला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आज टी20 मालिकेचा चौथा सामना पार पडला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यामध्ये टीम इंडियाने सामना गमावला पण आता भारताच्या कर्णधाराने नवा रेकॅार्ड त्याच्या नावावर केला आहे आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माचा रेकॅार्ड देखील मोडला आहे. सुर्यकुमार याच्याकडून टीम इंडियाचे कर्णधारपद हिसकावल्यानंतर श्रेयस अय्यरकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून आयर्लंडविरुद्ध पहिली मालिका खेळली, भारतासाठी कर्णधार म्हणून तर श्रेयस अय्यरने चांगली कामगिरी केली आहेच त्याचबरोबर त्याने एक फलंदाज म्हणून देखील प्रभावी कामगिरी केली आहे.
चौथ्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा 87 धावांनी मोठा पराभवाला सामोरे जावे लागले, या सामन्यामध्ये किवी संघाने रेकॅार्ड ब्रेकिंग कामगिरी केली. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. 259 धावांचा पाठलाग करताना प्रत्युत्तरात, भारतीय संघ 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून केवळ 172 धावाच करू शकला. या सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने 11 चेंडूमध्ये 22 धावा केल्या, या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन अय्यर मोठा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला पण आता त्याने त्याच्या नावावर नवा रेकॅार्ड केला आहे.
हे ही वाचा
मनीषा भानवालाचे जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, अशी कामगिरी करणारी पहिली महिला!
श्रेयस अय्यरने रोहित शर्माचा मोडलेल्या रेकॅार्डबद्दल सांगायचे झाले तर रोहित शर्माने 2022 मध्ये भारतीय कर्णधार म्हणून 29 सामन्यांमध्ये 24.29 च्या सरासरीने 656 धावा केल्या होत्या. 2026 मध्ये भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने हा रेकॅार्ड मोडला आहे त्याने फक्त 25 सामन्यांमध्ये 31.71 च्या सरासरीने 666 धावा केल्या आहेत, या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकेही झळकावली आहेत.