• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /एकाच देशाच्या दोन क्रिकेटपटूंनी जिंकला आयसीसी 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार

एकाच देशाच्या दोन क्रिकेटपटूंनी जिंकला आयसीसी 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार

13 ऑक्टोबर रोजी भारतीय कर्णधार शुभमन गिलला मंगळवारी विक्रमी पाचव्यांदा आयसीसीचा 'प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून गौरवण्यात आले, तर सलामीवीर शेफाली वर्माला आशिया कप आणि आशियाई खेळांमधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महिला गटात हा सन्मान मिळाला.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 13, 2026, 02:59 PM IST|Updated: Oct 13, 2026, 03:15 PM IST
joinshare
एकाच देशाच्या दोन क्रिकेटपटूंनी जिंकला आयसीसी 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या टी20 मालिका खेळवली जात आहे, याचदरम्यान आयसीसीने 'प्लेअर ऑफ द मंथ'ची घोषणा केली आहे. यामध्ये आता टीम इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला आहे, पुरुष खेळाडूंने तर हा पुरस्कार जिंकलाच आहे त्याचबरोबर महिला खेळाडूने देखील हा पुरस्कार जिंकून भारताचे नाव मोठे केले आहे. 13 ऑक्टोबर रोजी भारतीय कर्णधार शुभमन गिलला मंगळवारी विक्रमी पाचव्यांदा आयसीसीचा 'प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून गौरवण्यात आले, तर सलामीवीर शेफाली वर्माला आशिया कप आणि आशियाई खेळांमधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महिला गटात हा सन्मान मिळाला.

भारताचा कर्णधार शुभमन गिल याने त्याचा मित्र अभिषेक शर्माला मागे टाकत त्याने हा पुरस्कार जिंकला आहे. भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार असलेल्या गिलने गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावले. त्याने 133 चेंडूंमध्ये 223 धावांची खेळी केली, ज्यात 26 चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. या उजव्या हाताच्या फलंदाजाने 117 चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण केले, जे एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद द्विशतक ठरले. त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजने ठेवलेले 405 धावांचे लक्ष्य गाठले, जे एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांचे सर्वात मोठे लक्ष्य आहे.

भारतीय संघाची नुकतीच झालेली उपकर्णधार शेफाली वर्माने मागील काही काळामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. आता तिला या कामगिरीचे फळ मिळाले आहे आणि शेफाली वर्माचा हा दुसरा 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार आहे. 2025 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये शेफाली वर्माची महत्त्वाची भूमिका होती. तिने संघासाठी कमालीची कामगिरी सेमीफायनल आणि फायनलमध्ये केली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत, तिने बांगलादेशविरुद्ध उपांत्य सामन्यात नाबाद 100 धावा आणि श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात 48 धावा केल्या.

सप्टेंबर महिन्यात शेफालीने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये आपला ठसा उमटवला. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. तिने 184.61 च्या स्ट्राईक रेटने 360 धावा केल्या. तिने सहा बळीही घेतले आणि संघाला सुवर्णपदक जिंकण्यास मदत केली. हरमनप्रीत कौरने तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्व गटात हा बदल झाला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Shubman Gill
Cricket News
Sports News