Asian Games 2026 : एशियन गेम्स 2026 ही स्पर्धा 19 सप्टेंबर पासून सुरु झालेली तर त्याचा शेवट हा 23 ऑक्टोबर रोजी झाला. यात भारताच्या तब्बल 501 खेळाडूंनी सहभाग घेतलेला त्यापैकी अनेकांनी पदक मिळवून भारताचं नाव मोठं केलं. तर अनेक खेळाडू मात्र रिकाम्या हातीच भारतात परतले. एशियन गेम्समध्ये भारताने तब्बल 85 पदकं जिंकले यात 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश होता. एशियन गेम्समध्ये सर्वाधिक 341 पदकं पटकावणारा देश चीन ठरला. तर भारत मेडल टाळीत चौथ्या क्रमांकावर राहिला. एशियन गेम्समध्ये क्रीडा स्पर्धेतील घसरलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने गुरुवार 15 ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित केली आहे.
गुरुवारी 15 ऑक्टोबर 2026 रोजी क्रीडा मंत्रालयाने एशियन गेम्समध्ये घसरलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांच्या उपस्थितीत नेमकी चूक कुठे झाली, याचा शोध घेत उपाययोजनेवर मंथनदेखील होणार आहे. भारताने 501 खेळाडूंचे पथक जपानला एशियन गेम्स 2026 साठी पाठविले होते. त्यांच्यावर तीन वर्षांपासून 700 कोटींचा खर्च करण्यात आला.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 85 पदके जिंकली. त्याआधी, हांगझाऊ येथे झालेल्या स्पर्धेतील 106 पदकांच्या विक्रमी आकड्याच्या तुलनेत ही संख्या फार कमी आहे. भारताच्या 21 सुवर्णपदकांपैकी 11 सुवर्णपदके ही शेवटच्या दोन दिवसांत तिरंदाज, पुरुष व महिला हॉकी संघ, बॉक्सर आणि महिला गोल्फर यांच्या दमदार कामगिरीमुळे मिळाली. बॅडमिंटन, शूटिंग आणि अॅथलेटिक्समधील अनुभवी खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीवर चर्चा या बैठकीत अपेक्षित आहे.
एशियन गेम्स 2026 मेडल टॅली :
चीन - 169 सुवर्ण, 89 रौप्य, 83 कांस्य - एकूण 341 पदकं
जपान -83 सुवर्ण, 95 रौप्य, 91 कांस्य - एकूण 269 पदकं
दक्षिण कोरिया - 39 सुवर्ण, 43 रौप्य, 68 कांस्य - एकूण 150 पदकं
भारत -21 सुवर्ण, 27 रौप्य, 37 कांस्य - एकूण 85 पदकं