SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शेवटच्या ओव्हरचा रोमांच, पाकिस्तानच्या जबड्यातून कसा खेचून आणला विजय? जाणून घ्या 'त्या' ओव्हरमध्ये काय काय घडलं?

U19 Asia Cup 2026 : भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये ओमान येथे अंडर 19 आशिया कप 2026 चा सामना खेळवला गेला होता. या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये सामना फिरला आणि भारताने अंडर 19 आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 15, 2026, 06:35 AM IST | Updated: Nov 15, 2026, 07:36 AM IST
Image Credit: भारताने पाकिस्तानच्या जबड्यातून कसा खेचून आणला विजय?
Join

U19 Asia Cup 2026 : क्रिकेटच्या खेळात नेहमी असं म्हंटलं जातं की जोपर्यंत शेवटचा बॉल पूर्ण होत नाही तोपर्यंत पराभव स्वीकारायचा नाही आणि विजयी होण्याची आशा सोडू नये. अनेकदा असं पाहिलं जातं की अनेकदा एखादा संघ हा शेवटच्या बॉलमुळे हाताजवळ आलेला विजय गमावतात. असंच काहीस अंडर 19 आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आलेल्या फायनलमध्ये पाहायला मिळालं. भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये ओमान येथे अंडर 19 आशिया कप 2026 चा सामना खेळवला गेला होता. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने हा सामना जवळपास जिंकला होता. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये सामना फिरला आणि भारतीय संघाचा अवघ्या 1 विकेटने विजय झाला. तेव्हा या सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये असं काय झालं? ज्यामुळे सामना पूर्णपणे पलटला.  

भारत - पाक यांच्यात फायनल शेवटच्या ओव्हरचा रोमांच :  

भारताविरुद्धच्या 19 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 337 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात, भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली, परंतु ठराविक अंतराने विकेट्स पडत राहिल्यामुळे पाकिस्तान सामन्यात टिकून राहिला; मात्र, एक सकारात्मक बाब म्हणजे भारताने यादरम्यान काही लहान लहान भागीदारी उभारण्यात यश मिळवले. यामुळे 49  ओव्हरच्या अखेरीस भारतीय संघाने 9 विकेट गमावून 330 धावा केल्या होत्या. या टप्प्यावर भारतीय संघाला शेवटच्या 6 बॉलवर 8 धावांची गरज होती, तर पाकिस्तानला विजयासाठी 1 विकेट हवा होता.

 

पहिला बॉल : शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर भारताचा मोहित उल्वा फलंदाजी करत होता, तर अहाम हुसेन गोलंदाजी करत होता. या बॉलवर  मोहितला स्टंपिंग करण्यासाठी अपील करण्यात आले, परंतु तो बचावला. मात्र, या चेंडूवर कोणतीही धाव निघाली नाही.

 

दुसरा बॉल : अहमद हुसेनने वाईड बॉल टाकला, ज्यामुळे भारताला एक अतिरिक्त आणि अत्यंत मोलाची धाव मिळाली. मोहित स्ट्राईकवर कायम राहिला.

तिसरा बॉल : मोहितने 'पॉइंट' क्षेत्राच्या दिशेने फटका मारून एक धाव घेतली. त्यानंतर चिगुरुपती व्यंकट फलंदाजीसाठी आला. आता भारतीय संघाला उर्वरित ४ बॉलमध्ये ६ धावांची गरज होती.

चौथा बॉल : चिगुरुपती व्यंकटने या बॉलवर एक धाव घेतली आणि पुन्हा मोहितकडे स्ट्राईक सोपवली. आता संघाला शेवटच्या तीन बॉलवर 5 धावांची गरज होती.

पाचवा बॉल:  या बॉलवर मोहितने पुन्हा एकदा एक धाव घेतली आणि चिगुरुपती व्यंकटकडे स्ट्राईक सोपवली.

सहावा बॉल : या बॉलवर चिगुरुपती व्यंकटने आणखी एक धाव घेतली आणि स्ट्राईक मोहितकडे सोपवला.

सातवा बॉल : डावाच्या या शेवटच्या बॉलवर, मोहितसमोर तीन धावा करण्याचे आव्हान होते. अनेकांना हे कठीण वाटत असतानाच मोहितने 'वाईड लाँग-ऑफ'च्या दिशेने चौकार मारला आणि पाकिस्तानच्या हातातून विजय खेचून आणत तो भारताच्या झोळीत टाकला.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES