• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /पुन्हा मौका मौका! 8 नोव्हेंबर रोजी क्रिकेटच्या मैदानात भिडणार भारत-पाकिस्तान, वेळापत्रकाची घोषणा

पुन्हा मौका मौका! 8 नोव्हेंबर रोजी क्रिकेटच्या मैदानात भिडणार भारत-पाकिस्तान, वेळापत्रकाची घोषणा

U19 Asia Cup 2026 : पुरुष अंडर 19 आशिया कप 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून यानुसार ही स्पर्धा 5 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत पार पडेल. या स्पर्धेच्या लीग स्टेजमध्ये एकूण 12 सामने होतील तर दोन ग्रुपमधील सर्वोच्च दोन संघ सेमी फायनलसाठी क्वालिफाय करतील.

Reported Bypooja pawar
Published: Oct 09, 2026, 06:30 AM IST|Updated: Oct 09, 2026, 07:24 AM IST
joinshare
पुन्हा मौका मौका! 8 नोव्हेंबर रोजी क्रिकेटच्या मैदानात भिडणार भारत-पाकिस्तान, वेळापत्रकाची घोषणा

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

U19 Asia Cup 2026 : एशियन क्रिकेट काउन्सिलने आगामी पुरुष अंडर 19 आशिया कप 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. 9 दिवसांची ही रोमांचक स्पर्धा ओमानमध्ये खेळवली जाणार असून यंदा या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होतील. हे सामने ओमानच्या दोन मैदानांवर खेळवले जातील. डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून पाकिस्तानचा अंडर 19 संघ मैदानावर उतरेल ज्यांनी मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात अंडर 19 आशिया कपचे विजेते म्हणून ट्रॉफीवर नाव कोरलेले.

पुरुष अंडर आशिया कप 2026 ची सुरुवात 5 नोव्हेंबरला होणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून स्पर्धेत भाग घेणाऱ्या आठ संघांना प्रत्येकी चार - चार अशा दोन गटात विभागण्यात येणार आहे. यातील ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, यूएई आणि नेपाळचा समावेश आहे, तर ग्रुप बीमध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान, मलेशिया आणि ओमान हे संघ असणार आहेत. या स्पर्धेच्या लीग स्टेजमध्ये एकूण 12 सामने होतील तर दोन ग्रुपमधील सर्वोच्च दोन संघ सेमी फायनलसाठी क्वालिफाय करतील.

भारत - पाक सामन्याकडे सर्वांचं लक्ष :

भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा त्यांच्या सामन्याकडे जगाचं लक्ष असतं. दोन्ही संघ हे ग्रुप ए मध्ये आहे. त्यामुळे दोघांमधील ग्रुप स्टेजचा सामना हा 8 नोव्हेंबर रोजी ओमानमध्ये ओसीए ग्राउंड 1 वर होईल. क्रिकेटप्रेमींच्या नजरा या अत्यंत चुरशीच्या सामन्यावर खिळलेल्या असतील. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) येथील आयसीसी अकादमी मैदानावर खेळल्या गेलेल्या 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात फरहान युसूफच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने 191 धावांनी विजय मिळवत आपले दुसरे अंडर-19 आशिया कप विजेतेपद पटकावले होते. यावेळी त्या पराभवाचा बदला घेण्याच्या आणि विजेतेपद जिंकण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरेल.

50 ओव्हरची असणार स्पर्धा :

गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या स्पर्धेप्रमाणेच ही संपूर्ण स्पर्धा 50 ओव्हरच्या स्वरूपात खेळवली जाईल. सर्व 15 सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरू होतील.ओमान क्रिकेट अकादमीच्या ओसीए ग्राउंड 1 आणि ओसीए ग्राउंड 2 वर होणाऱ्या या सामन्यांमध्ये आशियातील युवा खेळाडूंची पुढची पिढी आपली गुणवत्ता सादर करण्यास सज्ज आहे. भारतीय संघ यावेळी आणखी एक विजेतेपद पटकावणार की पाकिस्तान आपले वर्चस्व कायम राखणार हे 14 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याच्या दिवशीच समजेल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sports News
Marathi News
News in Marathi
Marathi Batmya
Cricket News