Baba Aparajith Retirement : तामिळनाडूचा माजी कर्णधार बाबा अपराजितने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने यासह आपल्या 15 वर्षांचं करिअर समाप्त केलं असून त्याने आपल्या करिअरमध्ये अंडर 19 स्तरावर भारताचा प्रतिनिधित्व केलं होतं. अपराजितने एकूण 102 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले असून 32 वर्षीय क्रिकेटरने आपल्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूसाठी क्रिकेट खेळून आपली ओळख बनवली आहे. त्यानंतर 2024-25 मध्ये तो केरळला गेला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी गेला. बाबा अपराजितचा भाऊ बाबा इंद्रजित सुद्धा क्रिकेटर आहे.
बाबा अपराजितच्या नावावर 20 शतक :
बाबा अपराजितने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट टाकून निवृत्तीची घोषणा केली. त्याने सांगितलं की तो आता कोचिंगमध्ये आपलं करिअर बनवण्यावर लक्ष ठेवेल. यासह तो तामिळ भाषेत कॉमेंट्री सुद्धा करतो. अपराजितने क्रिकेटच्या सर्व प्रकारांत मिळून 20 शतकं झळकावली आहेत. तो तमिळनाडूच्या अशा तीन संघांचा भाग होता ज्यांनी विजेतेपदे पटकावली होती; यामध्ये 2017-18 मधील विजय हजारे ट्रॉफी, तसेच 2020-21आणि 2021-22 मधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकणाऱ्या संघांचा समावेश आहे.
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये केलं दमदार प्रदर्शन :
भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप 2012 मध्ये बाबा अपराजित हा खेळाडू पहिल्यांदा चर्चेत आला. तिथे त्याने 171 धावा केल्या आणि आपल्या ऑफ-स्पिन गोलंदाजीद्वारे पाच विकेट घेतले. पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' (सामनावीर) म्हणून निवडण्यात आले. 2015 मध्ये त्याची इंडिया ए संघातही निवड झाली होती. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट या संघांचा भाग होता परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.
कसं होतं बाबा अपराजितचं करिअर?
बाबा अपराजितने 102 फर्स्ट क्लास सामन्यात 5199 धावा, 12 शतकं आणि 75 विकेट घेतले. 114 लिस्ट ए सामन्यात त्याने 4278 धावा 8 शतकं आणि 83 विकेट घेतल्या. बाबा अपराजितने 63 टी20 सामने खेळले असून यात 1147 धावा केल्या आहेत. तर टी20 सामन्यात त्याने 17 विकेट घेतल्या आहेत.