कधी आणि कुठे पाहता येणार IND vs NZ दुसऱ्या टी20 सामन्यांची फ्री Live Streaming? वाचा सविस्तर
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणारा टी20 मालिकेचा दुसरा सामना हा कधी आणि कुठे क्रिकेट चाहत्यांना पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारताच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेमध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. आता काही तासांमध्ये टीम इंडियाचा दुसरा सामना सुरु होणार आहे, पहिल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने भारतासमोर आव्हान उभे केले होते. या सामन्यामध्ये संजू सॅमसनच्या खेळीने आणि श्रेयस अय्यरच्या कामगिरीने संघाला सावरले होते आणि टीम इंडियाने विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये न्यूझीलंडचा संघ मोठे आव्हान उभे करु शकते, किवी संघ मालिकेमध्ये बरोबरी करण्याच्या इराद्यात दुसऱ्या सामन्यामध्ये उतरेल. आता टीम इंडिया दुसऱ्या सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये काही बदल होऊ शकतात.
भारताच्या संघाचा अनुभवी खेळाडू भुवनेश्वर कुमारने संघामध्ये पुनरागमन 4 वर्षानंतर केले आहे. तर इशान किशनने हा मालिकेमधून दुखापतीमुळे बाहेर झाला आहे, आता त्याच्या जागेवर वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दोन्ही संघांमध्ये एक चुरशीची लढत अपेक्षित आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणारा टी20 मालिकेचा दुसरा सामना हा कधी आणि कुठे क्रिकेट चाहत्यांना पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
हे ही वाचा
कधी आणि कुठे पाहता येणार सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या टी20 मालिकेचा दुसरा सामना हा 24 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या मालिकेचा दुसरा सामना हा न्यूझीलंडमधील हॅगली पार्क साऊथ येथे खेळवला जाणार आहे, हा सामना मनोरंजक होणार आहे. मालिकेतील पहिला सामनाही याच मैदानावर खेळला गेला होता. भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी, म्हणजेच दुपारी 12.00 वाजता, दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 आंतरराष्ट्रीय मालिका भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होत आहे. भारतीय चाहते दुसरा टी20 सामना सोनी स्पोर्ट्स चॅनलवर थेट पाहू शकतात. मोबाईल आणि लॅपटॉप वापरकर्ते SonyLIV ॲप आणि वेबसाइटवर भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी20 सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. मात्र, यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शनची आवश्यकता असेल. तुम्ही हा सामना मोफत देखील पाहू शकता, भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना डीडी फ्री डिशद्वारे डीडी स्पोर्ट्सवर विनामूल्य थेट प्रक्षेपित केला जाईल. तुम्ही भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना येथे विनामूल्य पाहू शकता.