SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सामन्याची वेळ बदलली, चाहत्यांची झोपमोड होणार! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming?

आता भारताची नजर कसोटी मालिकेवर असणार आहे, भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिका कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 18, 2026, 15:17 IST | Updated: Nov 18, 2026, 16:26 IST
Join

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय आणि टी20 मालिका झाल्यानंतर टीम इंडियाचे लक्ष आता कसोटी मालिकेवर असणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु होणारी कसोटी मालिका भारतीय चाहत्यांना पाहण्यासाठी पहाटे उठावे लागणार आहे. भारताच्या संघाने टी20 मालिका 3-2 ने जिंकली तर एकदिवसीय 3-1 ने जिंकून कमालीची कामगिरी आतापर्यत केली आहे. आता भारताची नजर कसोटी मालिकेवर असणार आहे, भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिका कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु होणारी कसोटी मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची असणार आहे. न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर आहे, तर भारताचा संघ गुणतालिकेमध्ये चौथ्या स्थानावर आहे. भारताचे मोजकेच कसोटी सामने शिल्लक आहेत, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी टीम इंडियासमोर आगामी सामन्यांमध्ये मोठे आव्हान असणार आहे. टीम इंडियाला फायनलमध्ये जाण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. आता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.

हे ही वाचा

4 मॅचमध्ये 30 च धावा... रोहितमुळे मित्रही अडचणीत! निवृत्तीसंदर्भातील चर्चेसाठी घेतलेली रोहितची भेट; नेमकं हे प्रकरण काय?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी पहाटे 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे तर न्यूझीलंडच्या वेळेनुसार हा सामना सकाळी 11.00 वाजता सुरु होणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याचे नाणेफेक सकाळी पहाटे 3.00 वाजत होईल तर न्यूझीलंडच्या वेळेनुसार या सामन्याचे नाणेफेक 10.30 वाजता होणार आहे. या सामन्याचे आयोजन बसीन रिझर्व्ह, विलिंगटोन येथे खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील सामन्यांचे थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे, तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग ही सोनी लिव्हवर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 

टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग 11: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, अंशुल कंबोज.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES