IPL 2027 चा लिलाव कधी आणि कुठे होणार? तारीख जाहीर
आयपीएल 2027 च्या आधी मिनी ऑक्शन होणार आहे त्यामध्ये अनेक मोठ्या खेळाडूंवर देखील बोली लागणार आहे. आता आगामी सिझनचा लिलाव कधी आणि कुठे होणार आहे याची तारिख आणि ठिकाण जाहीर करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून आयपीएलच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत, अनेक ट्रेडच्या बातम्या त्याचबरोबर अनेक फ्रन्चायझींनी नव्या कोचची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात अनेक अपडेट्स समोर येत आहे, आयपीएल 2027 ची फ्रन्चायझींनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा संघ सध्या कर्णधाराच्या शोधात आहे, कारण रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या संघामध्ये परतला आहे. आयपीएल 2027 च्या आधी मिनी ऑक्शन होणार आहे त्यामध्ये अनेक मोठ्या खेळाडूंवर देखील बोली लागणार आहे. आता आगामी सिझनचा लिलाव कधी आणि कुठे होणार आहे याची तारिख आणि ठिकाण जाहीर करण्यात आले आहे.
क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार 16 डिसेंबर रोजी मिनी लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे, या लिलावाचे आयोजन गोव्यामध्ये केले जाणार आहे असे सांगितले जात आहे. 16 डिसेंबर रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामनाही त्याच दिवशी बंगळूरुमध्ये खेळवला जाणार आहे. तथापि, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप लिलावाची तारीख आणि ठिकाणाला अधिकृत मंजुरी दिलेली नाही. आयपीएल 2027 आधी मिनी लिलाव होणार आहे, त्याआधी 15 नोव्हेंबरपर्यंत 10 फ्रँचायझींनी यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा
अंपायरच्या एका चुकीने तुटलं देवदत्त पडिक्कलचं स्वप्न; 1 धावेने मुकलं द्विशतक! पहा व्हिडिओ
आयपीएलच्या नियमांनुसार, मोसम संपल्यानंतर एका महिन्याने ट्रेड विंडो उघडते आणि लिलावाच्या एक आठवडा आधीपर्यंत खुली राहते. लिलावाच्या आधी कोणत्या खेळाडूंना फ्रन्चायझी रिटेन करणार आणि कोणत्या खेळाडूंना रिलीज करणार ही माहिती मिळणे गरजेचे आहे. याच्या आधारे, संघ आपली रणनीती तयार करू शकतील आणि गरजेनुसार नवीन खेळाडू मिळवण्याची योजना आखू शकतील. मागील सिझनच्या समाप्तीपासून आयपीएल ट्रेड विंडोद्वारे लिलावापूर्वी केवळ दोनच खेळाडूंची अदलाबदल झाली आहे.
जूनमध्ये, लखनौ सुपर जायंट्सने आपला कर्णधार ऋषभ पंतला अनुभवी मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या बदल्यात दिल्ली कॅपिटल्सकडे (DC) पाठवले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने वेगवान गोलंदाज टी. नटराजनच्या बदल्यात नवोदित लेग-स्पिनर झीशान अन्सारीला संघात सामील करून घेतले. लिलावाच्या उर्वरित तारखा जाहीर झाल्यानंतर, 2027चा हंगाम कधी सुरू होईल, हे लोक इंटरनेटवर शोधू लागले आहेत. 2027 मध्ये आयपीएल होईल आणि त्यानंतर टीम इंडिया लगेचच विश्वचषकाची तयारीला सुरुवात करेल.