SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला, नेमकं काय घडलं होतं?

30 जुलै 2004 मध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघाने मुंबईत येऊन खेळू नये अशी भूमिका असणाऱ्या हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आणि पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियांदाद यांची झालेली भेट ही त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 17, 2026, 16:31 IST | Updated: Nov 17, 2026, 17:02 IST
Image Credit: पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला, नेमकं काय घडलं होतं?
Join

Javed Miandad And Balasaheb Thackeray Meet : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 14 वी पुण्यतिथि आहे. यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग त्यांच्यावर प्रेम करणारी त्यांना फॉलो करणारी माणसं शेअर करत असतात. बाळासाहेब ठाकरे हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठं काम करत होतेच मात्र यासोबतच त्यांना कला आणि खेळात सुद्धा रस होता. अशातच आठवतो तो किस्सा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधांवरून बाळासाहेब ठाकरे यांची अत्यंत आक्रमक आणि कठोर भूमिका असताना मुंबईतील  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या 'मातोश्री' वर 30 जुलै 2004 रोजी पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियांदाद याने त्यांची भेट घेतलेली.  

काय होतं भेटीचं कारण?

बाळासाहेब ठाकरे आणि पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियांदाद यांची भेट ही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष यांच्या पुढाकाराने झाली असल्याचे तेव्हाच्या काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर येते. शिवसेनेने पाकिस्तानी खेळाडूंना कोणत्याही स्पर्धेसाठी किंवा सामन्यांसाठी मुंबईत खेळू द्यायचे नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती. तेव्हा पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतात खेळण्याची संधी मिळावी, अशी विनंती करण्याचाही या भेटीमागे उद्देश होता. तसेच बाळासाहेब ठाकरे हे क्रिकेटचे मोठे चाहते होते. राजकीय मतभेद बाजूला सारून क्रिकेटर जावेद मियांदाद याचा खेळ बाळासाहेबांना आवडला होता. यात विशेषतः 8 एप्रिल 1986 रोजी शारजाह येथे झालेला भारत-पाकिस्तान ऑस्ट्रेलेशिया कपचा अंतिम सामना बाळासाहेबांच्या लक्षात होता. या सामन्यात मियांदादने चेतन शर्माच्या बॉलवर सिक्स ठोकला होता. यावेळी बाळासाहेबांनी जावेद मियांदाद याच त्यांच्या निवासस्थानी चांगलं आदरातिथ्य केलं.  
जावेद मियांदाद हा त्याच्या एका टेलिव्हिजन चॅनल असाइनमेंटसाठी तेव्हा भारतात आलेला. तेव्हा तो कोलकाता, दिल्ली, मुंबई अशा विविध ठिकाणी कार्यक्रम करत होता.

भेटीनंतर काय म्हणाले बाळासाहेब ठाकरे?

बाळासाहेब ठाकरे आणि पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियांदाद यांची भेट झाल्यावर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना बाळासाहेब म्हणाले होते की, 'जावेद मियांदाद हा क्रिकेटपटू म्हणून मला आवडतो. 1986 मध्ये शारजाह येथे त्याने चेतन शर्माच्या गोलंदाजीवर मारलेला उंच सिक्स मी कधीही विसरू शकत नाही.

भेटीनंतर काय म्हणाला जावेद मियांदाद?

बाळासाहेब ठाकरे आणि पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियांदाद यांची भेट झाल्यावर मियांदाद म्हणाला की, 'बाळासाहेब हे क्रीडाप्रेमी आहेत, हे सहज लक्षात येते. लोक त्यांच्याबद्दल जसे बोलतात, तसे ते नाहीयेत. भेट घेऊन मला खूप छान वाटलं. बाळासाहेबांचे प्रेम आणि शुभेच्छा घेऊन मी पाकिस्तानला परत जाईन. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य यांना एक छोटी बॅट सुद्धा मियांदादने भेट दिली होती.

पाकिस्तानी क्रिकेट संघाला मुंबईत खेळू देणार नाही यासाठी आक्रमक असलेले बाळासाहेब ठाकरे आणि पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियांदाद यांची झालेली ही भेट त्यावेळी खूप चर्चेचा विषय ठरलेली होती. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES