IND VS NZ T20 And ODI Series : 22 ऑक्टोबर पासून टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे आणि टेस्ट संघासाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाहीये. न्यूझीलंड दौऱ्यासाठी वनडे आणि टेस्ट संघाची घोषणा होण्यास उशीर का होतोय याचं कारण आता समोर आलं आहे. भारतीय संघाचे वनडे आणि टेस्ट संघ 28 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडसाठी रवाना होणार आहेत आणि त्यापूर्वीच संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धची भारताची वनडे सीरिज ही 4 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.
संघ जाहीर करण्यात का होतोय उशीर?
प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा या दोघांच्या फिटनेस रिपोर्टला उशीर होत असल्याने वनडे आणि टेस्ट संघाची घोषणा करण्यात सिलेक्टर कमीटीला उशीर होत असल्याचं समोर आलं आहे. 30 सप्टेंबर रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान प्रसिद्ध कृष्णाला हॅमस्ट्रिंगच्याची समस्येचा त्रास जाणवला. त्यानंतर त्याला वनडे सीरिजमधून बाहेर काढण्यात आले आणि 'सेंटर ऑफ एक्वॅलन्स' मध्ये पाठवण्यात आले. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार त्याला केवळ खबरदारीचा उपाय म्हणून तिथे पाठवण्यात आले होते. तरीही तिथे पोहोचल्यानंतर त्याच्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला. तर वेगवान गोलंदाज हर्षित राणा देखील 'सेंटर ऑफ एक्सेलेन्स'मध्ये आहे. 25 ऑक्टोबर रोजी त्याची 'रिटर्न-टू-प्ले' मॅच सिम्युलेशन चाचणी होण्याची अपेक्षा आहे, याचा अर्थ असा की त्याला सामन्यासारख्या परिस्थितीत ठेवून त्याची टेस्ट घेतली जाईल.
बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की 'इंडिया ए' संघाच्या पहिल्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी ऋषभ पंत उपलब्ध नसेल. इराणी चषक स्पर्धेदरम्यान पंतला 'साइड स्ट्रेन'ची दुखापत झाली होती. दुखापतीतून सावरणाऱ्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी देण्याबाबत 'सेंटर ऑफ एक्सेलेन्स' आता अधिक खबरदारी घेत आहे. कारण परवानगी मिळाल्यानंतर खेळाडूंना पुन्हा दुखापत झाल्याच्या घटनांमुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार ऋषभ पंत आणि प्रसिद्ध कृष्णाला खूप गंभीर दुखापत झालेली नाही. तरीही सीओई कोणताही धोका पत्करायला तयार नाही. प्रसिद्ध कृष्णा हा वनडे आणि टेस्ट अशा दोन्ही प्रकारच्या सामन्यांसाठी वेगवान गोलंदाजीच्या गटातील गटातील एक महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. 19 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टेस्ट सीरिसाठी पंत हा भारतीय संघाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असेल. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंसाठी तीन आठवड्यांचा रिकव्हरी कालावधी निश्चित करण्यात आला आहे. राणाबाबत सांगायचे तर निवड समिती आणि संघ व्यवस्थापन त्याला वनडे आणि टेस्ट अशा दोन्ही संघांमध्ये समाविष्ट करण्यास उत्सुक असल्याचे समजते. शिवाय राणा आठव्या क्रमांकावर फलंदाजीचा पर्यायही उपलब्ध करून देतो.