• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /मोहम्मद सिराजला प्लेईंग 11 मध्ये का बाहेर केलं? न्यूझीलंड टेस्ट ड्रॉ झाल्यावर कर्णधार गिलने सोडलं मौन

मोहम्मद सिराजला प्लेईंग 11 मध्ये का बाहेर केलं? न्यूझीलंड टेस्ट ड्रॉ झाल्यावर कर्णधार गिलने सोडलं मौन

India VS New Zealand : भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज याला न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्याच्या प्लेईंग ११ मध्ये सामील करण्यात आलं नाही. यावरून बराच बाद आणि आरोप झाले. मात्र हा टेस्ट सामना संपल्यावर शुभमन गिलने याबाबत मौन सोडलं आहे.

Reported Bypooja pawar
Published: Nov 23, 2026, 15:36 IST|Updated: Nov 23, 2026, 16:21 IST
joinshare
मोहम्मद सिराजला प्लेईंग 11 मध्ये का बाहेर केलं? न्यूझीलंड टेस्ट ड्रॉ झाल्यावर कर्णधार गिलने सोडलं मौन
Image Credit: मोहम्मद सिराजला प्लेईंग 11 मध्ये का बाहेर केलं? न्यूझीलंड टेस्ट ड्रॉ झाल्यावर कर्णधार गिलने सोडलं मौन

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांवर चाकूहल्ला! 5 पोलीस जखमी, फरार झालेल्या आरोपीला गोळ्या घालून...

धक्कादायक! पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांवर चाकूहल्ला! 5 पोलीस जखमी, फरार झालेल्या आरोपीला गोळ्या घालून...

2

याच महिन्यात पुन्हा होऊ शकतो भारत - पाकिस्तान सामना, टीम इंडिया घेऊ शकते कालच्या पराभवाचा बदला

3

मागच्या 5 वर्षात ₹118170000000 कोटी कमी; BMC च्या फिक्स डिपॉझिटला कशी लागली गळती?; धक्कादायक माहिती!

4

भारताच्या चौथ्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्याचं नाव बदलणार? अचानक का घेण्यात आलाय निर्णय?

5

'...एका आमदाराचं रामनाम सत्य होणार होतं', संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य; तो आमदार कोण? म्हणाला 'मीच त्यावेळी...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

 India VS New Zealand : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील पहिल्या सामन्याचा आज शेवटचा दिवस होता. या सामना अनिर्णित राहिला. या सामन्याच्या प्लेईंग 11 मध्ये गोलंदाज मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आलेला नव्हता. ज्यावरून खूप चर्चा झाली आणि टीका देखील झाली. अनेक माजी क्रिकेटर्स आणि एक्स्पर्टसनी मोहम्मद सिराजच्या बाहेर जाण्यावर नाराजी व्यक्त केली. फॅन्सनी या निर्णयासाठी हेड कोच गौतम गंभीरवर टीका केली. आता सामना ड्रॉ झाल्यावर कर्णधार शुभमन गिलने मोहम्मद सिराजला प्लेईंग 11 मध्ये सामील न करण्याच्या निर्णयाविषयी मौन सोडलं. त्याने याच खरं कारण सांगितलं.  

कर्णधार शुभमन गिलने बोलताना म्हटलं की मोहम्मद सिराजला ड्रॉप करण्याचा निर्णय हा खूप कठीण होता. कर्णधार गिलने सिराजच्या फॉर्मबाबत सुद्धा स्पष्ट केलं. तो म्हणाला की फॉर्म नसणं हे मोहम्मद सिराजच्या बाहेर होण्याचं नेमकं कारण आहे.

शुभमन गिलने नेमकं काय सांगितलं?

सामना झाल्यावर कर्णधार शुभमन गिल मोहम्मद सिराजला ड्रॉप करण्याबाबत म्हणाला की, 'मोहम्मद सिराज हा माझा खूप चांगला मित्र आहे. त्याला संघातून बाहेर करणं हा निर्णय थोडा अवघड होता. आम्ही सोबत खूप क्रिकेट खेळलो आहे आणि मी त्याला सुरुवातीच्या दिवसांपासून ओळखतो. टेस्ट साम्ण्याच्यापूर्वी मी त्याच्याशी बोललो आणि त्याला या निर्णयाबाबत समजावलं आणि त्याला सुद्धा ते कळलं. प्रत्येक खेळाडूच्या करिअरमध्ये एक असा फेज येतो जिथे तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये नसतो. आम्ही खेळाडूंना त्यांचा सध्याचा फॉर्म पाहूनच निवडलं आहे'.

मोहम्मद सिराजने त्याचा शेवटचा टेस्ट सामना हा ऑगस्टमध्ये श्रीलंकेच्या विरुद्ध खेळला होता. त्याने आतापर्यंत त्याच्या करिअरमध्ये 48 टेस्ट सामने खेळलेले आहेत. या सामन्यात 90 इनिंगमध्ये गोलंदाजी करताना सिराजने 29.63 च्या सरासरीने 144 विकेट घेतले ज्यात 9/190 ही त्याची बेस्ट फिगर आहे.

हेही वाचा : मॅच ड्रॉ झाल्यावर कर्णधार शुभमन गिलने ICC कडे केली मोठी मागणी, कूकाबुरा बॉलवर उपस्थित केला प्रश्न

पुढील टेस्ट सामना कधी?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा टेस्ट सामना हा 27 नोव्हेंबर शुक्रवार पासून सुरु होणार आहे. हा सामना क्राइस्टचर्चच्या हँगली ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल. सामन्याची सुरुवात ही सकाळी 3:30 वाजता होईल. हा सामना भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर दाखवला जाईल तर याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अँपवर होईल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
Shubman Gill