रोहित शर्माने का निवडली 45 नंबरची जर्सी? आई आणि राहुल द्रविडशी आहे खास कनेक्शन, स्वतः सांगितला किस्सा
Rohit Sharma Jersey Number : रोहित शर्माचा जर्सी क्रमांक 45 ही त्याची ओळख आहे. कुठेही 45 क्रमांकाची भारतीय जर्सी पाहिली तर रोहित शर्माची आठवण फॅन्सला होते. मात्र रोहितने हाच जर्सी क्रमांक का निवडला याचं कारण जाणून घेऊयात.
Rohit Sharma Jersey Number : हिटमॅन या नावाने प्रसिद्ध असलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा मैदानात उतरताना 45 क्रमांकाची जर्सी घालतो. एका शोमध्ये रोहितने आपल्या जर्सीवरील 45 नंबर का निवडला याचं कारणं सांगितली आहेत. यामागे रोहित शर्माने त्याची आई आणि राहुल द्रविड असल्याचे सांगितले.
गेमिंग रिऍलिटी शोमध्ये विचारला प्रश्न:
रोहित शर्मा सध्या एक रिऍलिटी शो फॅमिली फुल हाउस विथ रोहित शर्मा हा शो होस्ट करत आहे. या शो दरम्यान अभिनेता राहुल लोहानीने रोहितला त्याच्या 45 नंबरच्या जर्सी मागचं कारण विचारलं. राहुल म्हणाला की जेव्हा 45 नंबरची जर्सी लोक बघतात त्यांना तुमचीच आठवण येते. तेव्हा नेमका हाच क्रमांक जर्सी नंबर म्हणून का निवडला असा प्रश्न रोहितला करण्यात आला.
अंडर 19 क्रिकेटमध्ये घालायचा 19 नंबरची जर्सी :
रोहित शर्माने प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की, 'जेव्हा त्याने पहिल्यांदा क्रिकेट खेळण्यासाठी जर्सी घातली, तेव्हा त्याला आपल्या पसंतीचा क्रमांक निवडायचा होता. त्याला एक अंकी क्रमांक हवा होता. परंतु पाच, आठ आणि नऊ यांसारखे क्रमांक आधीच इतर खेळाडूंनी घेतले होते. तेव्हा रोहितकडे त्याच्याकडे केवळ 19 हा क्रमांक शिल्लक होता. रोहितला हा क्रमांक आवडला आणि त्याने आपल्या अंडर-19 क्रिकेटच्या दिवसांत 19 क्रमांकाची जर्सी घातली होती. केली होती'.
राहुल द्रविडमुळे सोडली 19 नंबरची जर्सी :
रोहित शर्माने सांगितलं की, जेव्हा भारतीय संघासाठी खेळण्याची वेळ आली तेव्हा रोहितला समजलं की तो 19 क्रमांकाची जर्सी घालू खेळू शकत नाही, कारण आधीच राहुल द्रविड हे भारतीय संघाचे कर्णधार होते आणि त्यांचा जर्सी क्रमांक हा 19 होता. रोहितच्या सांगण्यानुसार त्याला कोणीतरी सांगितले होते की, तो अंडर 19 संघासाठी खेळताना 19 क्रमांकाची जर्सी वापरू शकत असला, तरी भारतीय संघासाठी खेळताना तो हा क्रमांक वापरू शकणार नाही, कारण तो राहुल द्रविडचा क्रमांक होता. हे ऐकल्यावर रोहितने दुसरा क्रमांक निवडण्याचा निर्णय घेतला.
रोहितने आईचा घेतला सल्ला :
रोहित शर्मा म्हणाला की, 'हॉटेलवर पोहोचल्यावर मी लगेचच आईला फोन केला की मी कोणता जर्सी क्रमांक निवडू? तेव्हा आईने लगेचच 9 क्रमांकाची जर्सी निवडण्याचा सल्ला दिला. मात्र तो क्रमांक सुद्धा दुसऱ्या खेळाडूंकडे होता. तेव्हा रोहितला 27 क्रमांकाची जर्सी घालायचीही नव्हती. त्याला चार आणि पाच हे क्रमांक एकत्र असलेले खूप आवडायचे. त्याने आपल्या आईला असेही सांगितले की 45 ही संख्या चांगली दिसते आणि या दोघांची बेरीज ही नऊ येते. त्यानंतर, रोहित शर्माने आपल्या जर्सीसाठी 45 ही संख्या निवडली'.