• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /हेटमायर आणि पॉवेल रोहित शर्माचा रेकॅार्ड मोडणार? 'हिटमॅन'चा रेकॅार्ड धोक्यात

हेटमायर आणि पॉवेल रोहित शर्माचा रेकॅार्ड मोडणार? 'हिटमॅन'चा रेकॅार्ड धोक्यात

लहान फॉरमॅटमध्ये, वेस्ट इंडिजकडे शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि रोमारियो शेफर्ड यांच्यासारखे आक्रमक फलंदाज आहेत, आता भारताविरुद्ध मालिकेमध्ये आता वेस्ट इंडिजचे आक्रमक फलंदाज रोहित शर्माचा रेकॅार्ड मोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 05, 2026, 06:13 PM IST|Updated: Oct 05, 2026, 06:23 PM IST
joinshare
हेटमायर आणि पॉवेल रोहित शर्माचा रेकॅार्ड मोडणार? 'हिटमॅन'चा रेकॅार्ड धोक्यात

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये मालिकेला सुरुवात झाली आहे, या मालिकेच्या पहिल्यामध्ये वेस्ट इंडिजचे काही बलवान खेळाडू देखील खेळत आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचे खेळाडू खेळणार आहेत, या मालिकेमध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माचा रेकॅार्ड मोडू शकतो. एकदिवसीय मालिका जिंकण्याआधी भारताचा संघ आता टी20 मालिका जिंकण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. भारताच्या मागील रेकॅार्डबद्दल सांगायचे झाले तर भारताच्या संघाने मायदेशामध्ये खेळलेल्या मागील 10 सामन्यांपैकी 9 सामने जिंकले आहेत. तथापि, इतर फॉरमॅटच्या तुलनेत टी-२० मध्ये वेस्ट इंडिजला अधिक मजबूत संघ मानले जाते.

लहान फॉरमॅटमध्ये, वेस्ट इंडिजकडे शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि रोमारियो शेफर्ड यांच्यासारखे आक्रमक फलंदाज आहेत, ज्यांच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत सामन्याचे चित्र पालटण्याची ताकद आहे. हे तिघेही लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मग भारताचा हिटमॅन हा मोठ्या षटकांसाठी ओळखला जातो आता त्याचा रेकॅार्ड या मालिकेमध्ये धोक्यात असल्याचे मानले जात आहे.  रोहित शर्माच्या नावावर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे. त्याने 2009 ते 2022 दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्धच्या 22 सामन्यांमध्ये 39 षटकारांसह 693 धावा केल्या.

रोहितने कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो भारतासाठी केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहे . या यादीत त्याच्यानंतर वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक-फलंदाज निकोलस पूरन आहे. त्याने भारताविरुद्धच्या 20 सामन्यांमध्ये 592 धावा केल्या आणि 35 षटकार मारले. मात्र, आगामी मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात पूरनचा समावेश नाही. अनुभवी फलंदाज एव्हिन लुईसने भारताविरुद्धच्या नऊ टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 33 धावा केल्या आणि 28 षटकार मारले. त्याचाही वेस्ट इंडिज संघात समावेश नाही.

रोहित शर्माने आतापर्यत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहे पण आता शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल हे दोघे रेकॅार्ड मोडण्याच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहेत. या यादीमध्ये हेटमायर हा चौथ्या स्थआनावर आहे त्याने आतापर्यत भारताविरुद्ध 28 सामन्यांमध्ये 28 षटकार मारले आहे आणि 422 धावा केल्या आहेत. पॉवेलने भारताविरुद्धच्या 19 टी-20 सामन्यांमध्ये 25 षटकारांसह 408 धावा केल्या आहेत. पॉवेल केवळ एका उंच फटक्याने सूर्याला मागे टाकेल, पण अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी त्याला 15 षटकारांची गरज आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Rohit Sharma
Team india
IND vs WI
Cricket News