हेटमायर आणि पॉवेल रोहित शर्माचा रेकॅार्ड मोडणार? 'हिटमॅन'चा रेकॅार्ड धोक्यात
लहान फॉरमॅटमध्ये, वेस्ट इंडिजकडे शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि रोमारियो शेफर्ड यांच्यासारखे आक्रमक फलंदाज आहेत, आता भारताविरुद्ध मालिकेमध्ये आता वेस्ट इंडिजचे आक्रमक फलंदाज रोहित शर्माचा रेकॅार्ड मोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये मालिकेला सुरुवात झाली आहे, या मालिकेच्या पहिल्यामध्ये वेस्ट इंडिजचे काही बलवान खेळाडू देखील खेळत आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचे खेळाडू खेळणार आहेत, या मालिकेमध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माचा रेकॅार्ड मोडू शकतो. एकदिवसीय मालिका जिंकण्याआधी भारताचा संघ आता टी20 मालिका जिंकण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. भारताच्या मागील रेकॅार्डबद्दल सांगायचे झाले तर भारताच्या संघाने मायदेशामध्ये खेळलेल्या मागील 10 सामन्यांपैकी 9 सामने जिंकले आहेत. तथापि, इतर फॉरमॅटच्या तुलनेत टी-२० मध्ये वेस्ट इंडिजला अधिक मजबूत संघ मानले जाते.
लहान फॉरमॅटमध्ये, वेस्ट इंडिजकडे शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि रोमारियो शेफर्ड यांच्यासारखे आक्रमक फलंदाज आहेत, ज्यांच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत सामन्याचे चित्र पालटण्याची ताकद आहे. हे तिघेही लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मग भारताचा हिटमॅन हा मोठ्या षटकांसाठी ओळखला जातो आता त्याचा रेकॅार्ड या मालिकेमध्ये धोक्यात असल्याचे मानले जात आहे. रोहित शर्माच्या नावावर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे. त्याने 2009 ते 2022 दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्धच्या 22 सामन्यांमध्ये 39 षटकारांसह 693 धावा केल्या.
रोहितने कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो भारतासाठी केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहे . या यादीत त्याच्यानंतर वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक-फलंदाज निकोलस पूरन आहे. त्याने भारताविरुद्धच्या 20 सामन्यांमध्ये 592 धावा केल्या आणि 35 षटकार मारले. मात्र, आगामी मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात पूरनचा समावेश नाही. अनुभवी फलंदाज एव्हिन लुईसने भारताविरुद्धच्या नऊ टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 33 धावा केल्या आणि 28 षटकार मारले. त्याचाही वेस्ट इंडिज संघात समावेश नाही.
रोहित शर्माने आतापर्यत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहे पण आता शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल हे दोघे रेकॅार्ड मोडण्याच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहेत. या यादीमध्ये हेटमायर हा चौथ्या स्थआनावर आहे त्याने आतापर्यत भारताविरुद्ध 28 सामन्यांमध्ये 28 षटकार मारले आहे आणि 422 धावा केल्या आहेत. पॉवेलने भारताविरुद्धच्या 19 टी-20 सामन्यांमध्ये 25 षटकारांसह 408 धावा केल्या आहेत. पॉवेल केवळ एका उंच फटक्याने सूर्याला मागे टाकेल, पण अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी त्याला 15 षटकारांची गरज आहे.