धक्कादायक! किरकोळ वादावरून 22 वर्षीय क्रिकेटरवर तलवारीने हल्ला, नेमकं काय घडलं?
Crime News : मोहाली येथे एका 22 वर्षांच्या क्रिकेटरवर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. क्रिकेट प्रॅक्टिस दरम्यान झालेल्या एका किरकोळ वादावरून आरोपीने टोकाचं पाऊल उचललं.
Crime News : मोहालीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक 22 वर्षांचा क्रिकेटर सात्विक अमन याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आलेला आहे. क्रिकेट प्रॅक्टिस करत असताना क्रिकेटचा बॉल हा जवळच्या स्विमिंग पूलमध्ये जाऊन पडला. त्यावरून वाद झाला आणि तलवारीने (कृपाण) खेळाडूवर हल्ला करण्यात आला. बिहारमधील औरंगाबादचा रहिवासी असलेला सात्विक अमन, मोहालीच्या सेक्टर 74 ए मध्ये असलेल्या 'ओम साई क्रिकेट अकॅडमी' मध्ये सराव करत होता. सराव सुरू असताना त्याने मारलेला बॉल बाउंड्री ओलांडून जवळच असलेल्या स्विमिंग पूलमध्ये जाऊन पडला, ज्यामुळे वाद निर्माण झाला.
तरुण क्रिकेटरवर प्राण घातक हल्ला :
सदर प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, जेव्हा 22 वर्षांचा सात्विक स्विमिंग पूलमध्ये पडलेला क्रिकेट बॉल घेण्यासाठी केला तेव्हा गेट बंद होता. जेव्हा पूलचा मालक बाहेर आला, तेव्हा त्याने सात्विकला शिवीगाळ केली. सात्विकने त्याला बॉल परत देण्यास सांगितले, परंतु मालकाने सात्विकला बुक्की मारली. यानंतर आरोपी जसबीर सिंग आत गेला आणि एक तलवार घेऊन परत आला. स्वतःचा बचाव करण्यासाठी सात्विकने जवळच पडलेली एक बांबूची काठी उचलली, परंतु जसबीरने त्याच्या डोक्यावर वार केला. सात्विकने आपला डावा हात वर केला असता, तलवार त्याच्या हाताला लागली आणि तिथे जखम झाली. सात्विक अमनने सांगितले की तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने त्याच्या पाठीवर पुन्हा प्रहार केला आणि त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली.
हेही वाचा : आकिब नबीची टीम इंडियात निवड! 2 ऐवजी आता 5 वनडे खेळणार, पाहा भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजसाठी भारतीय संघ
आरोपी जसबीर सिंह विरुद्ध त्याने तक्रार दाखल केली :
22 वर्षीय सात्विकने त्याचा भाऊ साकेतला फोन केला आणि ते दोघे लगेचच मोहाली फेज 4 येथील चिमा रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. बलियाली गावचा रहिवासी जसबीर सिंग याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 118(1) (धोकादायक शस्त्राचा वापर करून स्वेच्छेने दुखापत पोहोचवणे) आणि कलम 351 (2) (गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.