SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'या' 6 स्टार खेळाडूंचा गुरु आहे युवराज सिंह, भारतीय संघासाठी करतायत धुवाधार खेळी

Yuvraj Singh Mentor Of 6 Cricketers : भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंह याने टीम इंडियाकडून खेळत सध्या धुवाधार कामगिरी करणाऱ्या ६ खेळाडूंना आपलं मार्गदर्शन देऊन त्यांना आत्मविश्वास दिला. या लिस्टमध्ये अभिषेक शर्मा सह वैभव सूर्यवंशी इत्यादींच्या नावाचा समावेश आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 26, 2026, 14:58 IST | Updated: Nov 26, 2026, 15:32 IST
Image Credit: 'या' 6 स्टार खेळाडूंचा गुरु आहे युवराज सिंह, भारतीय संघासाठी करतायत धुवाधार खेळी
Join

Yuvraj Singh Mentor Of 6 Cricketers : भारताचा दिग्गज माजी क्रिकेटर युवराज सिंह हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला असला तरी त्याने आपल्या मार्गदर्शनाखाली घडवलेले स्टार खेळाडू हे आज भारतासाठी धुवाधार कामगिरी करत आहेत. काही दिवसांपूर्वी रायजिंग स्टार्स आशिया कप 2026 मध्ये झालेल्या इंडिया ए विरुद्ध यूएई सामन्यात 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने जबरदस्त कामगिरी केलेली. वैभव सूर्यवंशीने खुलासा केला की या सामन्याच्या आधी जवळपास तीस मिनिट युवराज सिंहने त्याच्या सोबत फोनवर संवाद साधलेला. भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडूंना युवराज सिंहने मार्गदर्शन करून घडवलं आहे. तेव्हा अशा खेळाडूंविषयी जाणून घेऊयात.

'या' 6 स्टार खेळाडूंचा गुरु आहे युवराज सिंह :

शुभमन गिल : भारताचा सध्याचा वनडे आणि टेस्ट कर्णधार शुभमन गिल याच्या यशामागे सुद्धा युवराज सिंहचं योगदान आहे. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात युवराज सिंहने शुभमनला फलंदाजीतील अनेक छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या. त्याने त्याला उच्च स्तरावर स्पर्धा करण्यासाठी मानसिकदृष्ट्याही तयार केले. आज शुभमन गिलची गणना जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. खुद्द शुभमन गिलने अनेक प्रसंगी या यशाचे श्रेय युवराज सिंगला दिले आहे.

अभिषेक शर्मा : आपल्या विस्फोटक खेळीने जगभरात नाव कमावणाऱ्या अभिषेक शर्माने त्याच्या भारतीय संघातील पदार्पणाच्या ४ वर्षांपूर्वी युवराज सिंहच्या देखरेखी खाली खूप मेहनत घेतली होती. युवराजने त्याला शॉट सिलेक्शन, पॉवर हिटिंग इत्यादी गोष्टींमध्ये उत्कृष्टता आणण्यास मदत केली. सध्या तो T20 फॉरमॅटमधील भारताच्या सर्वात महत्त्वाच्या फलंदाजांपैकी एक आहे.

संजू सॅमसन : आपल्या करिअरच्या सर्वात कठीण काळातून जात असताना संजू सॅमसनने मार्गदर्शन आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी युवराज सिंह सोबत जोडला गेला होता. 2026 च्या टी20  वर्ल्ड कप दरम्यान, संजू सॅमसन खराब फॉर्मशी संघर्ष करत होता. युवराजने दिलेला सल्ला संजूला त्याचा आत्मविश्वास परत मिळवून देण्यात आणि खेळात अधिक सातत्य राखण्यात मोलाचा ठरला. युवराजसोबतच्या त्या संभाषणांनंतर, त्याने अनेकदा सामना जिंकून देणाऱ्या खेळी साकारल्या.

हेही वाचा : एकही चेंडू न खेळता खेळाडू गोल्डन डकवर आऊट, WBBL मधील विचित्र नियम! पहा Video

ऋषभ पंत : स्टार विकेटकिपर फलंदाज असलेल्या ऋषभ पंतने आयपीएल 2026  पूर्वी फलंदाजीला जास्त धारदार बनवण्यासाठी युवराज सिंहची मदत घेतली. त्यानंतर त्याने आयपीएलच्यानंतर युवराज सिंह सोबत  आपल्या फलंदाजीवर काम केले. त्याने अलीकडेच न्यूझीलंड दौऱ्यावर एक अविस्मरणीय शतक झळकावले.

प्रियांश आर्या : दिल्लीचा फलंदाज प्रियांश आर्याने प्रभसिमरन सिंह सोबत युवराज सिंहच्या देखरेखी खाली ट्रेनिंग घेतली. युवराज सिंग या युवा खेळाडूच्या फलंदाजीवर काम करत आहे आणि त्याला मार्गदर्शन देत आहे.

वैभव सूर्यवंशी : वैभव सूर्यवंशी याचं नाव सुद्धा आता या लिस्टमध्ये सामील झालेलं आहे. तिथे त्याने आपल्या अडचणी आणि तांत्रिक सुधारणांबाबत सल्ला घेतला, आणि मैदानात उतरताच त्याने यूएई विरुद्ध 204 धावांची कामगिरी करून सर्वांना थक्क करून सोडले.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES