• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /कामाची बातमी
  • /मोठी बातमी! SBI च्या 3.75 लाख ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचा हॅकर्सचा दावा, KYC डॉक्यूमेंट आणि वैयक्तिक माहिती धोक्यात

मोठी बातमी! SBI च्या 3.75 लाख ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचा हॅकर्सचा दावा, KYC डॉक्यूमेंट आणि वैयक्तिक माहिती धोक्यात

तुमचं एसबीआयमध्ये अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. बँकेच्या लाखो ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचे दावे समोर आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 20, 2026, 06:25 PM IST|Updated: Oct 20, 2026, 06:46 PM IST
joinshare
मोठी बातमी! SBI च्या 3.75 लाख ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचा हॅकर्सचा दावा, KYC डॉक्यूमेंट आणि वैयक्तिक माहिती धोक्यात
Image Credit: sbi data breach

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

देशातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध बँक एसबीआयसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जर तुमचं देखील एसबीआयमध्ये अकाऊंट असेल तर चिंतेची बातमी आहे. 'सिरियससिम' नावाच्या एका हॅकर ग्रुपने मोठा दावा केला आहे. 'सिरियससिम' ने असा दावा केला आहे की, एसबीआयच्या 3,75,000 ग्राहकांचा डेटा लीक करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर त्यांच्याकडे 2,722 पीडीएफ फाइल्सदेखील आहेत. याबद्दल सायबरपल्स56 नावाच्या सायबर सुरक्षा खात्याने सोशल मीडिया प्लॅटफॉम एक्स (X) वर माहिती दिली आहे. या दाव्यानंतर बँकिंग क्षेत्रासह देशात खळबळ माजली आहे. तरदुसरीकडे ज्याचे खाते एसबीआयमध्ये आहेत, अशा ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

SBI Data Breach Claim – Hackers Allegedly Claim Access to 3.75 Lakh Users’ Database Details: https://t.co/pccZZUpeb0 An unverified SBI data breach claim alleges that a threat actor named Siriusim posted customer records and banking documents online. The claimed dataset contains 375,000 CSV rows and 2,722 PDF files, but those figures do not establish that 3.75 lakh unique customers were affected. The post described personal customer information, loan applications, supporting documents, account-opening forms, and address details. The actor called it the first disclosure of the dataset. The authenticity, source, and extent of the alleged exposure remain unverified. #cybersecuritynews

— Cyber Security News (@The_Cyber_News) October 20, 2026

या दाव्यानुसार लीक झालेल्या डेटामध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती, कर्ज अर्ज, खाते खाते उघडण्याचे अर्ज, पत्ते आणि कागदपत्र आहेत. महत्त्वाचे म्हणजे या डेटा लीकबद्दल एसबीआयकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. जर हा दावा खरा असेल तर देशभरात मोठा घोटाळा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

बँकेमधील ग्राहकांची ही माहिती लीक केल्याचा दावा!

  1. ग्राहकांची वैयक्तिक माहिती 
  2.  बँक खाते उघडण्याशी संबंधित कागदपत्रे
  3. कर्जाचे अर्जही आहेत.
  4.  ग्राहकांच्या पत्त्यांशी संबंधित माहिती 

ग्राहकांनी ही सावधगिरी बाळगावी अन्यथा

जर हा दावा खरा असेल तर सीबीआयमध्ये अकाऊंट असलेल्या ग्राहकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा त्यांचं मोठं आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. 

  • कोणत्याही अनोळखी कॉल, लिंक किंवा मेसेजबाबत सावधगिरी ठेवा
  • कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका 
  • अनोळखी व्यक्तीला तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका.
  • तुमचा एटीएम पिन कोणासोबतही शेअर करू नका.
  • तुमच्या बँक खात्यामध्ये असा कोणताही व्यवहार झाला असेल ज्याची तुम्हाला माहिती नाही, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
  • याबद्दल तुमच्या बँकेला तात्काळ कळवा. 


 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Business News
Banking News
Breaking News