SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नाव, नंबर, पत्ता... सर्व माहिती डार्क वेबवर लीक! SBI ने दिली सायबर हल्ल्याची माहिती; तज्ज्ञ पथक...

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक झाल्याची अखेर कबुली दिली आहे. या प्रकरणात आता तज्ज्ञ पथक चौकशी करणार आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 21, 2026, 01:59 PM IST | Updated: Oct 21, 2026, 02:09 PM IST
Image Credit: SBI Bank data leak
Join

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं अकाऊंट असेल तर मोठी बातमी आहे. एका अज्ञात हॅकर गटाने सोशल मीडियावर दावा केला होता की त्यांच्याकडे एसबीआय ग्राहकांचा वैयक्तिक डेटा आहे. पण यावर एसबीआयकडून काहीही प्रतिक्रिया आली नव्हती. जेव्हा सायबर सुरक्षा देखरेख संस्थेनेही सदर दाव्याची माहिती पोस्ट केल्यानंतर बँकिंग क्षेत्रासह देशभरात खळबळ माजली आहे. दरम्यान अखरे बुधवारी बँकेकडून अधिकृतपणे सायबर हल्ल्या झाल्याचे कबुल करण्यात आलं आहे. 3897 ग्राहकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर लीक झाल्याची कबुली एसबीआय बँकनेने दिली आहे.

 

 

हेसुद्धा वाचा  - मोठी बातमी! SBI च्या 3.75 लाख ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचा हॅकर्सचा दावा, KYC डॉक्यूमेंट आणि वैयक्तिक माहिती धोक्यात

एसीबीआयच्या या कबुलीमुळे बँकिंग क्षेत्रासह ग्राहकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पण बँकेने त्यासोबत हेही स्पष्ट केलं आहे की, या सायबर हल्ल्यामुळे त्यांच्या कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाहीय. पण सोबतच त्यांनी आपल्या लाखो ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. 

बुधवारी बँकेने एक पत्र जाहीर केलं त्यात त्यांनी कबूल केलं आहे की, सायबर हल्ल्यादरम्यान सुमारे 3,897 ग्राहकांचा डेटा डार्क वेबकडे आहे. प्राथमिक तपासानुसार, ग्राहकांची नावे, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, ईमेल पत्ते, घराचे पत्ते, ग्राहक आयडी आणि कर्जाच्या नोंदी ही संपूर्ण माहिती लीक झाली आहे. बँकेने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की, या प्रकरणाच्या तपासासाठी एका स्वतंत्र सायबर सुरक्षा एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. 

ग्राहकांनी काय काळजी घ्यायची आहे?

एसबीआयमधील या सायबर हल्ल्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीदायक वातावरण आहे. सायबर तज्ज्ञांनी ग्राहकांना सांगितलं आहे की, अशा स्थितीत आता ग्राहकांनी फोन कॉल किंवा बनावट मेसेज्स पासून सावध राहायचं आहे. कारण या माहितीच्या आधारे त्यांना आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी तुमचा OTP, PIN, पासवर्ड किंवा कार्ड CVV कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. कोणतेही संशयास्पद फोन कॉल, कर्जाच्या ऑफर्स किंवा बँकेशी संबंधित ईमेल्सची पडताळणी केवळ SBI च्या अधिकृत साइडवर जाऊनच करा. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES