सरकारकडून मुलींसाठी अनेक योजना सुरू करण्यात येतात. अशातच अनेकांना सुकन्या समृद्धी योजनेबाबत माहितीच आहे. मात्र अनेकांचा या योजनेकडे कल कमी असल्याचे समोर आले आहे. तुम्हालादेखील तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि अन्य खर्चांसाठी मोठी रक्कमेची गुंतवणुक करायची आहे तर आजपासूनच सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुक करण्यास सुरुवात करा. तुम्हीदेखील या योजनेत दीर्घकाळासाठी गुंतवणुक करत असाल तर मुलगी सज्ञान झाल्यानंतर तुमच्याकडे 72 लाखांचा फंड तयार असणार आहे.
सुकन्या योजनेंतर्गंत तुम्ही मुलीच्या जन्माच्या वेळीच खातं सुरू करु शकता. तसंच, मुलीचे वय 21 वर्ष होईपर्यंत गुंतवणुक करु शकता. याचा मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत तुम्हाला यावर व्याज मिळत राहणार आहे. जर तुम्ही दरवर्षी या योजनेत 1.5 लाख रुपयांची गुंतवणुक करत असाल तर मुलगी सज्ञान होईपर्यंत तुम्हाला आरामात 72 लाखांचा फंड तयार होईल. हा कॉर्पस योजनेवर मिळणाऱ्या सध्याच्या व्याज 8.2 च्या आधारे मिळेल. जर सरकारने यावरील व्याज वाढवले तर तुमचा फंड आणखी होऊ शकतो.
जर तुम्ही 1.5 लाख रुपयांची गुंतवणुक सुकन्या योजनेत करत आहात तर याचा अर्थ तुम्हाला महिन्याला 12,500 रुपयांची गुंतवणुक करावी लागले. या प्रकारे तुमची एकूण गुंतवणुक 22.5 लाख रुपये इतकी होईल. तर, 49.3 लाख रुपयांची रक्कम तुम्हाला व्याज म्हणून मिळणार आहे. मुलीला 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 72 लाखा रुपयांचा अधिकचा निधी तयार होईल. मुलीच्या जन्मानंतर तुम्हाला फक्त 15 वर्षांपर्यंत गुंतवणुक करायची आहे. तुम्ही 2026मध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली तर 2047 पर्यंत तुमच्याकडे साधारण 72 लाख रुपयांपर्यंतचा निधी असेल.
या योजनेची खासियत म्हणजे तुम्हाला दरवर्षी व्याज मिळणार आहे. यावर शेअर बाजार व अन्य कोणत्याही बाहेरच्या फॅक्टरवर कोणताही परिणाम होत नाही. अर्थ मंत्रालय या योजनेच्या व्याज दराबाबत दर महिन्याला माहिती घेत असतात. त्याचबरोबर सरकारकडून यावर व्याज मिळण्याची गॅरेंटीदेखील दिली जाते. या पैशांचा वापर तुम्ही मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा अन्य कोणत्या खर्चासाठी करु शकतात.
या योजनेची चांगली गोष्ट म्हणजे, यातून मिळणारे व्याज हे चक्रवाढ व्याज आहे. त्यामुळं तुमचा अधिकचा निधी वाढत जातो आणि कमी वेळातच तुमच्याकडे अधिकचा फंड तयार होतो. तसंच, तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणुक करतात त्यावर इनकम टॅक्सच्या कलम 80 सी अंतर्गंत तुम्हाला सूट देखील मिळते.