हिंदी असो मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर हे अनेक कारणांमुळे कायम चर्चेत असतात. बालकलाकार, अभिनेता आणि आता दिग्दर्शन असा सचिन पिळगावकर यांच्या प्रवास आहे. झी 24 तासच्या टू द पॉईंट विथ कमलेश सूतार' या विशेष कार्यक्रमात सचिन पिळगावकर यांनी दिलखुलास गप्पा मारल्यात. यावेळी त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील कोणत्या दिग्दर्शकाला घाबरायचे आणि त्यांच्या गुरूंबद्दलही पिळगावकर यांनी खुलासा केला आहे.
या मुलाखतीत त्यांनी बालकलाकार असतानाच्या आठवणी सांगितल्यात. तेव्हाच त्यांनी हादेखील खुलासा केला की, बालकलाकार म्हणून आपण काम करतो तेव्हा आपल्या एक अनपेक्षित फ्रेम मिळतं, एक अचानक महत्त्व प्राप्त होतं. ही मिळालेले महत्त्व त्या वयात आपण सांभाळण्याऐवढी आकलनशक्ती नसते. अशातून तुमच्याकडून चुकीची वागणूक होण्याची शक्यता असते. पण मला आनंद आहे, त्या काळात मी कुठलाही बालकलाकराला असं वागताना पाहिलं नाही. मी सुद्धा यात वातावरणात शिस्त एक कलाकार म्हणून घडलो. त्यावेळचे दिग्दर्शक शिस्त प्रिय होते. ते स्टारडमला पकडून त्यांच्याशी असं झुकून वागणे असे दिग्दर्शक नव्हते. ते कामावर विश्वास ठेवायचे.
त्यांनी पुढे सांगितलं की, लहानपणी काम करताना सगळ्यात दिग्दर्शकाची भीती वाटायची. हेड मास्टरांचं नाव सांगायचं झालं तर टाक्स मास्टर राजाभाऊ परांजपे यांची भीती जास्त वाटायची. ते स्वत: एक अभिनेता असल्याने एका कलाकाराशी कसं वागायचं हे त्यांना माहिती होतं. ते अतिशय शिस्तबद्ध होते.
हिंदी मात्र कोणत्याही दिग्दर्शकाची भीती वाटायची नाही. कारण ते बालकलाकारांशी खूप चांगले वागायचे. मला तरी बालकलाकार म्हणून काम करताना दिग्दर्शकाचा वाईट अनुभव आला नाही. एक कलाकार म्हणून काम करताना दिग्दर्शकाला पाहून दडपण येईल, असं कोणीही हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये वागलेले नाहीय.
याच मुलाखतीत त्यांनी आपल्या गुरूंच्या नावाबद्दलही खुलासा केला आहे. ते म्हणाले की, मी काही टॅलेंडेड फिल्ममेकर अजूनही झालेलो नाहीय. मला जे काही येतं, ते मी करण्याचा प्रयत्न करत सातत्याने कायम करत असतो. मला जे काही शिकता आलंय, वरिष्ठांकडून ते शिकून मी त्याचा वापर करत असतो. कुठे, काय केल्याने काय होतं? हे कायम पाहत आलं आहे. मोठ मोठ्या लोकांची चित्रपट पाहून शिकलो आहे. ऋषिकेश मुखर्जी हे माझ्या गुरूंपैकी एक आहेत. रमेश सिप्पी हे देखील माझ्या गुरूंपैकी एक आहेत. त्यांच्याकडूनही मला बऱ्याच गोष्टी शिकता आलं. बरेच सिनेमे पाहिले. गोल्डी अंकल म्हणजेच विजयानंद यांच्याबरोबर काम केलं. त्यांच्याकडूनही भरपूर काही शिकता आलं.'