• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगात खळबळ! व्हायरसने शास्त्रज्ञांची झोप उडवली; WHOकडून अलर्ट जारी

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगात खळबळ! व्हायरसने शास्त्रज्ञांची झोप उडवली; WHOकडून अलर्ट जारी

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने एन्ट्री घेतली आहे. अमेरिका, स्पेन, फ्रान्स, सिंगापूरमध्ये वेगानं प्रसार होत आहे. WHOकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 11, 2026, 23:02 IST|Updated: Nov 11, 2026, 23:08 IST
joinshare
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगात खळबळ! व्हायरसने शास्त्रज्ञांची झोप उडवली; WHOकडून अलर्ट जारी

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

PJ.2.1 : जगभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटबाबत चर्चा रंगली आहे.  हा नवा व्हेरिएंट अनेक देशांमध्ये पसरला असून त्यानंतर आरोग्य यंत्रणांना सज्ज झाली आहे.  कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट सर्वप्रथम मे २०२६ मध्ये कॅनडाच्या ओंटारियोमध्ये समोर आला होता आणि आता तो अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तसेच आशियातील काही भागांपर्यंत पोहोचला आहे. हा नवीन व्हेरिएंट संसर्गाची नवी लाट आणू शकतो की नाही? याचा तज्ज्ञ शोध घेत आहेत.

कोरोना विषाणू आणि त्याच्या संसर्गाचा कहर जगानं २०२० मध्ये अनुभवला आहे. कोरोनामुळे लाखो लोकांनी जीव गमावला. संपूर्ण जगानं लॉकडाऊन पाहिला. या कटू आठवणी आजही ताज्या असताना कोरोना विषाणू एका नवीन रूपात परतला आहे. कॅनडाच्या ओंटारियो प्रांतात कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट आढळून आला आहे.  

हा व्हेरिएंट अमेरिका, स्पेन, फ्रान्स, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह जगाच्या विविध भागांत वेगाने पसरत आहे. या  व्हेरिएंटला'PJ.2.1' असं नाव देण्यात आले. या नवीन प्रकाराने जगभरातील शास्त्रज्ञांना चिंतेत टाकलं असून जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वाचा इशारा दिला आहे.  

कसा आहे कोरोनाचा नवा व्हेरिएंट?

नवा व्हेरिएंट एकाच वेळी म्यूटेशन करतोय. याला 'सॉल्टेशन व्हेरिएंट' असे म्हटलं जातं. मानवी पेशींच्या पृष्ठभागावरील 'एसी टू'शी जोडला जातो. वाढलेल्या बाइंडिंग क्षमतेमुळे वेगानं पसरतो. मानवी पेशींवर हल्ला करत असल्याचा दावा केला जात आहे. भारतात आतापर्यंत या नवीन व्हेरिएंट आलेला नसला तरी देशातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे. 

नव्या व्हेरिएंट PJ.2.1 ची लक्षणं सामान्य सर्दी-ताप आणि फ्लूशी मिळतीजुळती आहेत. केवळ लक्षणांवरून सामान्य विषाणूजन्य संसर्ग आणि कोविडचा हा नवीन प्रकार यांमधील फरक ओळखणे कठीण असल्याने, गरज पडल्यास चाचणी करणे हाच सर्वात प्रभावी उपाय ठरतो.

जरी हा नवीन प्रकार अनेक देशांमध्ये पसरत असला, तरी सध्या कोणताच जागतिक धोका नसल्याचं बोललं जात आहे.   मात्र खबरदारी घ्या, गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहा, वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असा सल्ला देण्यात आला आहे. 

दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरिएंट किती घातक ठरू शकतो? येत्या काही दिवसांत संशोधनाच्या आधारावर हे स्पष्ट होऊ शकेल.  परिणामी कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांची चिंता पुन्हा एकदा वाढली. 

नव्या व्हेरिएंटची लक्षणं काय?

थंडी, ताप येणे
थकवा
डोकेदुखी
नाक चोंदणे
घसा खवखवणे
स्नायूंमध्ये वेदना

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Health News
International News