• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /किचनमधील 'या' 5 गोष्टींमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, कशाप्रकारे होतं नुकसान?

किचनमधील 'या' 5 गोष्टींमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, कशाप्रकारे होतं नुकसान?

Heart Care Tips : दैनंदिन सवयींचा हृदयाच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. किचनमधील अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. तेव्हा अशा 5 गोष्टींविषयी जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Sep 30, 2026, 01:22 PM IST|Updated: Sep 30, 2026, 02:11 PM IST
joinshare
किचनमधील 'या' 5 गोष्टींमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, कशाप्रकारे होतं नुकसान?

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
काही तासात सुरु होणार WPL 2027 लिलाव! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार येणार Live Streaming?

काही तासात सुरु होणार WPL 2027 लिलाव! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार येणार Live Streaming?

2

भाजपाचा मोठा निर्णय! राज्यसभा पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट, 'या' नेत्याच्या नावाची घोषणा

3

महिलांनो सावधान! Online मागवलेली साडी Return करताच ₹99518 बँक बॅलेन्स ₹0 झाला; नेमकं तिच्यासोबत घडलं काय?

4

मीनाक्षी - राजेंद्र शिंदेंची चौकशी, सीसीटीव्ही फुटेज...; अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणाले, 'पुराव्याची सांगड घालून...' प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

5

मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूककोंडीचा फटका, 25 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Heart Care Tips :  हृदयाशी निगडित अनेक आजारांचा धोका सध्या वाढत असून अनेक युवकांना सुद्धा हृदयविकाराचा धोका जाणवू लागला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आग्नेय आशियाई प्रदेशात हृदय आणि  रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांमुळे दर मिनिटाला आठ जणांचा मृत्यू होतो आणि यापैकी निम्म्या मृत्यूंचे स्वरूप अकाली असते. आपल्या दैनंदिन सवयींचा हृदयाच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. आपल्या स्वयंपाकघरातच अशा काही गोष्टी असतात, ज्यांचा अतिवापर केल्यास हृदयाला हानी पोहोचू शकते.

जास्त मीठ आणि साखर :

जर जेवणात मीठ जास्त असेल तर जेवण बेचव होतं, मात्र मिठाचे सेवन जास्त वाढलं तर ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका असतो. ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव पडतो. त्याचप्रमाणे साखरेचे अतिसेवन वजन वाढणे, लठ्ठपणा आणि डायबेटिजचा वाढता धोका यांसारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते ज्यामुळे पुढे हृदयविकाराचा धोकाही वाढतो.

रिफाइंड तेलाचा जास्त वापर :

सध्याच्या घडीला अनेकजण जेवणासाठी रिफाइंड तेलाचा वापर करतात. मात्र तज्ज्ञ सांगतात की गरजेपेक्षा जास्त रिफाईंड तेलाचा वापर झाल्यास शरीरात अनहेल्दी फॅट्सचं प्रमाण वाढतं आणि हृदय चांगलं राहत नाही.

मैद्याचा वापर :

मैद्यापासून बनवलेली उत्पादने आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. कारण कुकीज, पास्ता, पिझ्झा किंवा ब्रेड यांसारख्या अनेक दैनंदिन खाद्यपदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. मैद्याचे वारंवार आणि अतिप्रमाणात सेवन करणे संतुलित आहाराचा भाग मानले जात नाही. पचनक्रियेवर परिणाम करण्यासोबतच यामुळे हृदयाच्या आरोग्यालाही हानी पोहोचू शकते.

प्लास्टिकचे डबे :

खाण्यापिण्याच्या गोष्टींसह स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कंटेनर सुद्धा हृदयविकाराचा धोका वाढवू शकते. तज्ज्ञ गरम अन्न प्लास्टिकच्या डब्यांमध्ये दीर्घकाळ साठवून ठेवण्याच्या सवयीविरुद्ध सल्ला देतात आणि शक्य असेल तेव्हा अधिक सुरक्षित पर्याय वापरण्याची शिफारस करतात.

खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा :

हृदय निरोगी ठेवण्यासाठी, दैनंदिन आहारात मीठ, साखर आणि तेलाचे प्रमाण नियंत्रित ठेवले पाहिजे. तसेच ताजे आणि पौष्टिक अन्नपदार्थांना प्राधान्य देणेही महत्त्वाचे आहे. आहारविषयक सवयींमध्ये सुधारणा करण्यासोबतच, हृदयाच्या आरोग्यासाठी दररोज शारीरिक हालचाल करणेही आवश्यक आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Marathi Batmya
News in Marathi
Lifestyle News