Diabetes Care Tips : डायबिटीज हा आजार आता केवळ जेष्ठ व्यक्तींनाच नाही तर अगदी तरुणांना सुद्धा होऊ लागला आहे. डायबिटीजवर नियंत्रणात नसेल तर त्या व्यक्तीला आरोग्याच्या इतरही समस्या होऊ लागतात. अनेकदा असं पाहिलं जातं की हाय ब्लड शुगर असलेल्या व्यक्तीला जर एखादी जखम झाली तर ती लवकर बरी होत नाही. म्हणेजच अनेकदा जेव्हा हाय ब्लड शुगर असणाऱ्या व्यक्तीचं जेव्हा ऑपरेशन करण्याची वेळ येते तेव्हा डॉक्टर त्याचं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्याचा सर्वात आधी प्रयत्न करतात. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी सतत वाढलेली राहते, तेव्हा रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि कडक होतात. त्यामुळे जखमेच्या ठिकाणी रक्त, पोषक तत्वे आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे त्वचा स्वतःहून लवकर बरी होऊ शकत नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असेल तर जिवाणू आणि संसर्गाशी लढण्याची पांढऱ्या रक्तपेशींची क्षमता कमी होते. तेव्हा हाय ब्लड शुगर असणाऱ्या व्यक्तींना जर दुखापत झाली तर त्यांनी कशी काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊयात.
जखम स्वच्छ करा आणि झाकून ठेवा :
हाय डायबिटीज असलेल्या व्यक्तीला जर दुखापत झाली तर त्या ठिकाणी जिवाणूंची वाढ रोखण्यासाठी ती जखम स्वच्छ करा. जर जखम थोडी मोठी असल्यास त्यावर लगेचच पट्टी बांधा कारण जर जखम उघडी राहिली तर त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. तसेच जखमेला पाणी लागून देऊ नका.
अनवाणी फिरणं टाळा :
डायबेटिज असलेल्यांनी हिरव्या गवतावर चालण्याचा सल्ला दिला जातो. परंतु दुखापत टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यांनी घराबाहेर पडताना नेहमी चपला घालण्याची सवय ठेवा. तसेच अधिकतर कच्च्या किंवा खडबडीत जमिनीवर अनवाणी चालणे टाळा.
फोड फोडू नका :
जर तुम्हाला डायबिटीज असेल तर ब्लड शुगर लेव्हल हे वाढलेले असेल आणि अशातच जर शरीरावर फोड, पुरळ अशा त्वचेच्या समस्या झाल्या असतील तर थोडी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचा मुरुम चुकूनही फोडण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यामुळे जखम होऊ शकते.
जखमेवर ही गोष्ट लावणं टाळा :
डायबेटिजच्या रुग्नांना जर कोणती दुखापत झाली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने एंटीबायोटिक क्रीम अप्लाय करू शकता. याशिवाय या गोष्टींची काळजी घ्या की जखमेवर हाइड्रोजन पेरोक्साइड अजिबात लावू नका. तुमच्या जखमेवर नियमितपणे लक्ष ठेवा आणि पू झाल्याची काही चिन्हे दिसतात का, याची खात्री करा.
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवा :
ब्लड शुगर असलेल्या व्यक्तींना नेहमीच आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवलं पाहिजे. परंतु जखम झाल्यास ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे अधिकच महत्त्वाचे ठरते. जखम लवकर बरी होण्यासाठी योग्य आहार घ्या आणि वेळेवर औषधे घ्या.