SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

हिवाळ्यात बनवा शेवग्याच्या शेंगांचं टेस्टी सूप, चवीचे चोचले पुरवण्यासह आरोग्यही राहील उत्तम

Moringa Stick Soup Recipe : हिवाळ्यात चवीचे चोचले पुरवण्यासह आरोग्यासह उत्तम असलेलं शेवग्याच्या शेंगांचं टेस्टी सूपची खास रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तेव्हा या सीजनमध्ये शेवग्याच्या शेंगांचं सूप घरी नक्की ट्राय करा.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 26, 2026, 20:06 IST | Updated: Nov 26, 2026, 20:29 IST
Image Credit: हिवाळ्यात बनला शेवग्याच्या शेंगांचं टेस्टी सूप, चवीचे चोचले पुरवण्यासह आरोग्यही राहील उत्तम
Join

Moringa Stick Soup Recipe : शेवग्याच्या शेंगा ही एक अशी भाजी आहे जी लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आपल्या डायटमध्ये सामील केली पाहिजे. तसेच हिवाळ्यात चहा, कॉफीपेक्षा गरमागरम शेवग्याच्या शेंगांचं सूप बेस्ट ठरतं. जे आरोग्यासाठी चांगलं आहेच मात्र त्यासोबतच टेस्टी सुद्धा आहे. शेवग्याच्या शेंगांचं सूप प्यायल्याने आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते सोबतच व्हिटॅमिन सीचा हा चांगला स्रोत असून यामुळे केस आणि त्वचेला सुद्धा फायदे मिळतात.

सूप तयार करण्यासाठी साहित्य :

दोन शेवग्याच्या शेंगा 
2 कप टोमॅटो 
1 इंच आकाराचं आलं
2 चमचे पिवळी मूग डाळ 
2 कप पाणी 
चवीनुसार मीठ

हेही वाचा : बटाटा नाही! कच्च्या केळ्यांपासून बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट टिक्की

सूपला फोडणी देण्यासाठी साहित्य :

1½ तूप 
छोटा चमचा जिरं 
1 लहान चमचा काळी मिरी पावडर 
½ चमचा कोथिंबीर

सूप बनवण्याची कृती :

भांड्यात मध्यम कापलेल्या शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो, आले, मीठ आणि मूग डाळ घाला, त्यानंतर गरजेनुसार पुरेसे पाणी ओता. हे सर्व मिश्रण प्रेशर कुकरमध्ये ठेवा आणि कुकरचे झाकण नीट बंद करा. कुकरच्या ३ शिट्ट्या होईपर्यंत थांबा. प्रेशर कुकरचे झाकण उघडा आणि सर्व घटक नीट शिजले आहेत का ते तपासा. त्यानंतर, शिजवलेले मिश्रण थोडे थंड होऊ द्या. सर्व काही थंड झाल्यावर, ब्लेंडरचा वापर करून ते पूर्णपणे एकजीव होईपर्यंत फिरवून घ्या. सर्व काही नीट वाटून झाल्यावर, मिश्रणाला गाळणीने गाळून घ्या, जेणेकरून शेवग्याच्या शेंगांमधील तंतू वेगळे होतील. फोडणी देण्यासाठी, एका पॅनमध्ये थोडे तूप गरम करा आणि त्यात जिरे टाका. जिरे तडतडू लागल्यावर ही फोडणी सूपमध्ये घाला. आता यात काळी मिरी पूड घाला आणि सूपला उकळी येऊ द्या. काही वेळातच शेवग्याच्या शेंगांचे सूप तयार होईल. त्यावरून चिरलेली ताजी कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES