Skin Care Tips : नैसर्गिक गोष्टी उपाय म्हणून अनेकदा चेहऱ्यावर सहज लावले जातात. मात्र याच नैसर्गिक गोष्टी अनेकदा चेहऱ्याला नुकसान पोहोचवू शकतात. अशातच 5 अशा नैसर्गिक गोष्टींबद्दल जाणून घेऊयात. ज्यांना चेहऱ्यावर लावताना अधिक लक्ष द्यायला हवं, अन्यथा त्यामुळे त्वचेला नुकसान पोहोचू शकतं.
एलोवेरा :
एलोवेरा एक अशी नैसर्गिक गोष्ट आहे जी लोकं त्वचेच्या आणि केसांच्या देखभालीसाठी वापरतात. मात्र एलोवेरामुळे ॲलर्जी देखील होऊ शकते. एलोवेरामधून पिवळसर पदार्थ बाहेर पडतो. एलोवेरा वापरताना फार कमी लोकं तो पदार्थ काढून टाकतात, पण तो प्रत्यक्षात एक प्रकारे विषारी पदार्थ असतो.
जेव्हा तुम्ही एलोवेरा कापून काढता, तेव्हा त्याला काप दिल्यावर काही वेळ तसेच ठेवा, जेणेकरून हा पिवळसर पदार्थ पूर्णपणे बाहेर निघून जाईल. त्यानंतर वापरण्यापूर्वी एलोवेरा स्वच्छ धुवून घ्यावा.
लिंबू :
लिंबूचा वापर अधिकतर लोकं त्वचेची टॅनिंग काढण्यासाठी करतात आणि जे खूप परिणामकारक ठरते. मात्र याला थेट त्वचेवर वापरल्याने नुकसान होऊ शकते. कारण लिंबू हे खूप नैसर्गिकपणे खूप ऍसिडिक असते. लिंबाचा वापर नेहमी कमी प्रमाणात करा आणि इतर नैसर्गिक घटकांमध्ये मिसळूनच त्याचा वापर करा. ते लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. जर तुम्हाला त्वचेवर पिंपल्स किंवा लहान छिद्र किंवा ओरखडे असतील तर याचा वापर करू नका.
कापूर :
पिंपल्स आणि खाजेपासून आराम मिळवण्यासाठी बहुतेक लोक कापराचा वापर करतात. कापरामध्ये अँटी फंगल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे कापूर हा कधीही थेट त्वचेवर लावू नये किंवा त्याचा अतिप्रमाणात वापर करू नये. यामुळे त्वचा कोरडी पडू शकते आणि तुमची त्वचा संवेदनशील असल्यास लालसरपणा वाढू शकतो. वापरण्यापूर्वी कानामागे किंवा कोपराच्या भागावर लावून याची चाचणी करा. जर खाज सुटली किंवा काही ॲलर्जीची लक्षणे दिसली तर ते त्वरित धुवून टाका आणि चेहऱ्यावर लावू नका. कापूर वापरण्यापूर्वी नेहमी खोबरेल तेल, बदामाचे तेल किंवा गुलाबपाणी यामध्ये मिसळून घ्यावा.
ॲपल साईड व्हिनेगर :
त्वचेच्या निगा राखण्यासाठीही लोक ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर करतात. हे जिवाणूंची संख्या प्रभावीपणे कमी करते आणि त्वचेची pH पातळी संतुलित करण्यास मदत करते. तसेच यामुळे डेड स्किन निघून जाते आणि डाग फिके पडतात ज्यामुळे त्वचा टवटवीत दिसते. मात्र ॲपल साईड व्हिनेगरमधील एसिडिक गुणधर्मांमुळे त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता असते. ऍपल साईड व्हिनेगर पाण्यात मिसळून लावायला हवं. तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगरचा एक भाग आणि किमान तीन ते चार भाग पाणी यांचे मिश्रण करावे.