• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /हेल्थ
  • /सकाळी उठताच पायाचे तळवे दुखायला लागतात? 'हे' असू शकत कारण, दुर्लक्ष करू नका

सकाळी उठताच पायाचे तळवे दुखायला लागतात? 'हे' असू शकत कारण, दुर्लक्ष करू नका

अनेकांना सकाळी उठल्यावर पायांच्या तळव्यांमध्ये वेदना जाणवतात. तेव्हा या वेदनेमागचं नेमकं कारण काय असू शकतं आणि या वेदनेपासून सुटका कशी होऊ शकते याविषयी जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Oct 13, 2026, 03:36 PM IST|Updated: Oct 13, 2026, 04:06 PM IST
joinshare
सकाळी उठताच पायाचे तळवे दुखायला लागतात? 'हे' असू शकत कारण, दुर्लक्ष करू नका

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Foot Pain : सकाळी झोपेतून उठताच पायाच्या तळव्यांना वेदना होणे ही अनेक लोकांसाठी एक सामान्य समस्या असेल, पण काहींना मात्र सकाळी उठल्यावर पायाच्या तळव्यांमध्ये तीव्र वेदना जाणवतात आणि तळव्यांमध्ये ताण किंवा कडकपणा देखील येतो. सुरुवातीला काही पावले चालल्यानंतर ही वेदना कमी होऊ शकते पण बराच वेळ उभे राहिल्यानंतर किंवा चालल्यानंतर वेदना पुन्हा उद्भवत असल्यास, त्याचे मूळ कारण प्लांटर फॅसिटायटिस हे असू शकते. मात्र या मागील कारण हे  प्लांटर फॅसिटायटिस असेलच असे नाही पण कधी कधी खूप वेळेपर्यंत असं उभं राहिल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने चपला घातल्याने तसे होऊ शकते. तेव्हा पायाच्या तळव्यांना होणाऱ्या वेदनेवरील उपाय जाणून घेऊयात.

प्लांटर फॅसिआइटिस असू शकतं कारण :

पायाच्या तळव्यात 'प्लांटर फॅशिया' नावाची fibrous tissue असते. हे टिशू टाचेच्या हाडाला पायाच्या बोटांशी जोडते आणि चालताना शरीराचा भार पेलण्यास मदत करते. जेव्हा या टिशूवर वारंवार आणि अतिप्रमाणात ताण पडतो, तेव्हा तिला सूज येऊ शकते आणि तिला किरकोळ नुकसान सुद्धा होऊ शकते. या स्थितीला 'प्लांटर फॅसिटायटिस' असे म्हणतात. सकाळी उठल्यानंतर पहिले पाऊल टाकताना टाचेत किंवा पावलाच्या तळव्यात तीव्र वेदना होऊ शकतात. काही वेळ चालल्यानंतर ही वेदना कमी होऊ शकते परंतु बराच वेळ उभे राहिल्यास ती पुन्हा उद्भवू शकते.

चुकीचे शूज किंवा चप्पल वापरणे:

पायाच्या तळव्यांमध्ये वेदना होण्यामागे चुकीच्या पद्धतीने फुटवेअर घालणे हे देखील कारण होऊ शकते. अतिशय कठीण तळवे, अपुरे कुशनिंग किंवा पायाच्या आर्चला योग्य आधार नसलेल्या चपला वापरल्याने पावलांच्या तळव्यांवरचा ताण वाढतो. विशेषतः दीर्घकाळ उभे राहिल्यास किंवा कठीण जमिनीवर चालल्यास ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. हे टाळण्यासाठी अशा प्रकारचे फुटवेअर वापरा जी तळव्यांना पुरेसे कुशनिंग देतात आणि पायाच्या आर्चला आधार देतात.

खूप वेळ उभे राहणं आणि वजन वाढणं :

जर तुम्ही असं काम करत असाल की जिथे खूप काळ दोन पायांवर उभं रहावं लागतं किंवा चालायला लागतं अशावेळी पायांवर अतिरिक्त दबाव पडत असतो. त्याचप्रमाणे शरीराचे वजन वाढल्याने पावलांवर अधिक भार पडतो. यामुळे टाचा आणि तळपायांच्या टिशूंवर अतिरिक्त ताण येतो आणि वेदना होतात. विशेषतः सकाळी या वेदना अधिक जाणवतात. शिवाय अचानक धावण्यास सुरुवात करणे, अतिशय कष्टाचे व्यायाम करणे किंवा दीर्घकाळ शारीरिक हालचाल नसताना अचानक खूप चालणे यांमुळेही पायांच्या तळव्यांना वेदना उद्भवू शकतात.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Health News
Marathi News
News in Marathi
Marathi Batmya