• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /हेल्थ
  • /दररोज व्यायाम करण्याची सवय कशी लावायची? जाणून घ्या 5 सोप्या ट्रिक

दररोज व्यायाम करण्याची सवय कशी लावायची? जाणून घ्या 5 सोप्या ट्रिक

Health News : व्यायाम हा शरीर सुदृढ ठेवण्यासाठी महत्वाचा आहे. मात्र दररोज व्यायामाची सवय लावणं हे काहींना कठीण वाटतं. तेव्हा दररोज व्यायाम करण्याची सवय कशी लावायची याच्या 5 सोप्या ट्रिक जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Oct 01, 2026, 12:52 PM IST|Updated: Oct 01, 2026, 02:24 PM IST
joinshare
दररोज व्यायाम करण्याची सवय कशी लावायची? जाणून घ्या 5 सोप्या ट्रिक

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Health News : फिट राहण्यासाठी अनेकजण एक्सरसाइज सुरु करतात मात्र काही दिवसांनी मात्र त्यांचं हे रुटीन सुरु राहत नाही. कधी थकवा तर काही कामाच्या कारणामुळे दररोज व्यायामाची सवय राहत नाही. मग असा प्रश्न पडतो की रोजच्या आयुष्यात व्यायामाची सवय लावायची तरी कशी? मग एका प्रसिद्ध फिटनेस कोचने याचे 5 ट्रिक्स सांगितले आहेत.

मनात असो वा नसो सुरुवात करा :

व्यायामाची सवय लावण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो सातत्याने करत राहणे. तुम्हाला दररोज व्यायाम करावासा वाटेलच असे नाही. काही वेळा तुम्हाला उत्साही वाटेल तर काही वेळा प्रचंड थकवा जाणवेल. अशा दिवसांत व्यायाम टाळण्याऐवजी फक्त सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. जरी तुमच्याकडे दीर्घ सत्रासाठी वेळ किंवा ऊर्जा नसेल तरीही थोडा वेळ नक्की काढा. अनेकदा एकदा का तुम्ही सुरुवात केली की, आपोआपच व्यायामाचा ओघ साधला जातो.

कमीत कमी 10 मिनिटांची मुमेंट नक्की करा :

दररोज खूप वेळ व्यायाम करणं आवश्यक नाही. जर तुम्ही खूप व्यस्त असाल किंवा एखाद्या दिवशी तुम्हला व्यायाम करावासा वाटत असेल तर किमान 10 मिनिटे तरी तुमचे शरीर सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही चालणे, स्ट्रेचिंग किंवा घरीच हलके व्यायाम करू शकता. दुसरीकडे, एखाद्या दिवशी तुम्हाला विशेष उत्साही वाटत असेल, तर तुम्ही तुमचा पूर्ण व्यायाम करू शकता. थोडक्यात सांगायचे तर, दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे हालचाल करत राहणे महत्त्वाचे आहे.

आधीपासून ठरवा तुम्हाला करायचं आहे :

अनेकदा आपण व्यायामाची गोष्ट आपल्या मनस्थितीवर सोडून देतो. म्हणजेच इच्छा असल्यास व्यायाम करायचा आणि नसेल तर तो टाळायचा. याच कारणामुळे तो दररोजचा व्यायाम खंडित होत राहतो. तेव्हा असं करण्याच्या ऐवजी व्यायामासाठी वेळ राखून ठेवा.व्यायाम पूर्ण केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी पुन्हा व्यायाम करण्याचा निर्णय घ्या. असं केल्यास हळूहळू व्यायामाची सवय लागेल.

आपल्या मेहनतीला क्रेडिट द्या :

फिटनेसचा विचार करताना, केवळ तुम्ही किती वजन कमी केले किंवा किती वेळ व्यायाम केला एवढेच महत्त्वाचे नाही तर त्या दिवशी तुम्ही व्यायामासाठी वेळ काढला, ही गोष्टही लक्षात घेणे महत्त्वाचे असते.

हेच रुटीन पुन्हा :

फिटनेसच्या बाबतीत दररोज परिपूर्ण असण्याची गरज नाही. सातत्य राखणे म्हणजेच प्रयत्न सुरू ठेवणे हेच महत्त्वाचे आहे. एखाद्या दिवशी व्यायाम कमी झाला, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Health News
Marathi News