• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /‘ठाकरे-शिंदे एकत्र येतील तीच खरी दिवाळी!’; शिवसेना आमदाराच्या विधानाने खळबळ; गिरीश महाजनांचीही तात्काळ प्रतिक्रिया

‘ठाकरे-शिंदे एकत्र येतील तीच खरी दिवाळी!’; शिवसेना आमदाराच्या विधानाने खळबळ; गिरीश महाजनांचीही तात्काळ प्रतिक्रिया

‘हे दोन्ही नेते एकत्र आले तर तीच खरी दिवाळी असेल,’ असे सूचक विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे आणि शिंदे यांच्यात राजकीय समेट होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 08, 2026, 19:12 IST|Updated: Nov 08, 2026, 19:26 IST
joinshare
‘ठाकरे-शिंदे एकत्र येतील तीच खरी दिवाळी!’; शिवसेना आमदाराच्या विधानाने खळबळ; गिरीश महाजनांचीही तात्काळ प्रतिक्रिया
Image Credit: शिवसेना एकत्र येण्याची चर्चा

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

तसं पाहायला गेलं तर ठाकरे आणि शिंदे हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे जशी राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा सुरु आहे तसे दोन्ही शिवसेना एकत्र येतील याची शक्यता फार कमीच आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात काही अशक्य नाही, हे आपण गेल्या वर्षात पाहिलंय. घडामोडी वेगाने घडतात, याचे सारे साक्षीदार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. यावर आता भाजपकडूनही प्रतिक्रिया आलीय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

शिवसेनेतील फूट दुर्दैवी

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेतील फुटीबद्दल नाराजी व्यक्त केली. ज्या दिवशी शिवसेना दुभंगली, तो अत्यंत दुर्दैवी प्रसंग होता. असा प्रसंग घडायला नको होता, असे ते म्हणाले.

ठाकरे-शिंदे एकत्र येण्याची इच्छा

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, अशी अपेक्षा रघुवंशी यांनी व्यक्त केली. दोन्ही नेते पुन्हा एकत्र आले तर तीच खरी दिवाळी ठरेल, असे ते म्हणाले.

NCPच्या चर्चांमुळे शिवसेनेच्या एकीकरणाचीही चर्चा

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर रघुवंशी यांचे विधान समोर आले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटांमधील राजकीय घडामोडींमुळे राज्यातील पक्षीय समीकरणांबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या दोन्ही गटांनीही एकत्र यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

2022 मधील फुटीनंतर कट्टर विरोधक

जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील अनेक आमदारांसह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड केले. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. पुढे शिवसेनेच्या नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवली. तेव्हापासून दोन्ही गटांमध्ये नेतृत्व, पक्षाची ओळख आणि राजकीय भूमिकांवरून संघर्ष सुरू आहे. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे. असे असले तरी दोन्ही पक्षातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसतोय.

काय म्हणाले गिरीश महाजन?

चंद्रकांत रघुवंशींनी खुप पक्ष बदलले आहेत.ते हसत असतात, रडत असतात, बोलत असतात. ते प्रवासी पुढारी आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीष महाजन यांनी दिली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Uddhav Thackeray
Eknath Shinde
shiv sena