IND VS NZ T20 Bhuvaneshwar Kumar : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळवली जात आहे. यातील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवून 1-0 ने आघाडी घेतलेली. या सीरिजमध्ये जवळपास 4 वर्षांनी भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात पुनरागमन झालं. पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली, मात्र यात तो एकही विकेट घेऊ शकला नाही. मात्र 24 ऑक्टोबर रोजी खेळवल्या जात असलेल्या दुसऱ्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला गोलंदाजीत विकेट घेण्यात यश मिळालं आणि 1432 दिवसांची त्याची प्रतीक्षा संपली. भुवनेश्वर कुमारने न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिचेल याला बाद केलं.
भुवनेश्वरबने घेतली विकेट :
अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारसाठी विकेट मिळवण्याची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे. 1425 दिवसांनंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी20 सामन्यातून त्याने पुनरागमन केले होते, परंतु त्या सामन्यात त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली, परंतु तिथे त्याची धुलाई झाली आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.
क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भुवनेश्वर कुमार अखेर एक विकेट मिळवण्यात यशस्वी ठरला. त्याने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये डॅरिल मिचेलला कॅच आउट केले. यासह 1432 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भुवनेश्वरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट मिळवली. त्याचा याआधीची विकेट देखील न्यूझीलंडविरुद्धचीच होती. 22 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 सामन्यात भुवनेश्वरने विकेट घेतली होती.
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना :
भारताची प्लेईंग 11 :
संजू सॅमसन (विकेटकिपर), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव
न्यूझीलंडची प्लेईंग 11 :
फिन ॲलन, टिम सायफर्ट (विकेटकिपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हन जेकब्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन