SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

1432 दिवसांची प्रतीक्षा संपली, भुवनेश्वर कुमारला मिळाली पहिली विकेट, कसं केलं बाद? पाहा Video

IND VS NZ T20 : 24 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी20 सामना खेळवला जात असून यात भारताचा दिग्गज गोलंदाज भुवनेश्वर कुमारला त्याची पहिली विकेट मिळाली आहे. यासह त्याची 1432 दिवसांची प्रतीक्षा संपली ज्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये सुद्धा उत्साह संचारला आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 24, 2026, 01:37 PM IST | Updated: Oct 24, 2026, 02:20 PM IST
Image Credit: 1432 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भुवनेश्वर कुमारने मिळवली पहिली विकेट
Join

IND VS NZ T20 Bhuvaneshwar Kumar : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळवली जात आहे. यातील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवून 1-0 ने आघाडी घेतलेली. या सीरिजमध्ये जवळपास 4 वर्षांनी भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात पुनरागमन झालं. पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली, मात्र यात तो एकही विकेट घेऊ शकला नाही. मात्र 24 ऑक्टोबर रोजी खेळवल्या जात असलेल्या दुसऱ्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला गोलंदाजीत विकेट घेण्यात यश मिळालं आणि  1432 दिवसांची त्याची प्रतीक्षा संपली. भुवनेश्वर कुमारने न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिचेल याला बाद केलं.

भुवनेश्वरबने घेतली विकेट :

अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारसाठी विकेट मिळवण्याची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे. 1425 दिवसांनंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी20 सामन्यातून त्याने पुनरागमन केले होते, परंतु त्या सामन्यात त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली, परंतु तिथे त्याची धुलाई झाली आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.

क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भुवनेश्वर कुमार अखेर एक विकेट मिळवण्यात यशस्वी ठरला. त्याने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये डॅरिल मिचेलला कॅच आउट केले. यासह 1432 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भुवनेश्वरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट मिळवली. त्याचा याआधीची विकेट देखील न्यूझीलंडविरुद्धचीच होती. 22 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 सामन्यात भुवनेश्वरने विकेट घेतली होती.

हेही वाचा : दिवाळीआधीच मुंबई इंडियन्सचा धमाका, नव्या हेड कोचची घोषणा, चाहत्यांमध्ये उत्साह

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना :

भारताची प्लेईंग 11 :

संजू सॅमसन (विकेटकिपर), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव

न्यूझीलंडची प्लेईंग 11 :

फिन ॲलन, टिम सायफर्ट (विकेटकिपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हन जेकब्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES