SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दिवाळीपूर्वी 31 ऑक्टोबर रोजी किती आहे LPG गॅस सिलेंडरची किंमती, पाहा आजचे घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर

LPG Gas Cylinder Price Today : आज 31 ऑक्टोबर 2026 रोजी सरकारी तेल कंपन्या या दररोज सकाळी घरगुती आणि व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किंमतींची घोषणा करतात. तेव्हा आज तुमच्या शहरातील LPG गॅस सिलेंडरच्या किंमती किती आहेत याविषयी जाणुन घेऊयात.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 31, 2026, 09:51 AM IST | Updated: Oct 31, 2026, 10:28 AM IST
Image Credit: आजच्या LPG गॅस सिलेंडरच्या किंमती
Join

LPG Gas Cylinder Price Today 21 October 2026 : 31 ऑक्टोबर रोजी LPG गॅस सिलेंडरची बुकिंग करण्यापूर्वी तुमच्या शहरातील ताज्या घरगुती आणि व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किंमती एकदा तपासून घ्या. सरकारी तेल कंपन्या या दररोज सकाळी घरगुती आणि व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किंमतींची घोषणा करतात. आज 31 ऑक्टोबर 2026 रोजी, भारतातील प्रमुख शहरांमध्ये 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती स्थिर आहेत. घरगुती सिलिंडरच्या किंमतीत शेवटचा बदल जून महिन्यात झाला होता, तेव्हा त्यात 29 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

मागील अनेक महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल झालेला नाही. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत जवळपास दर महिन्याला चढ उतार होत असतात. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 1 ऑक्टोबर 2026 रोजी वाढ झाली होती. व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 62.50 रुपये ते 71.50 रुपये इतकी दरवाढ लागू करण्यात आली. याआधी, 1 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी किमतींमध्ये 9.50 रुपये ते 11.50 रुपये इतकी किरकोळ वाढ केली होती.

तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती :

दिल्ली    939.50 रुपये    
नोएडा    939.50 रुपये    
मुंबई            941.50 रुपये    
कोलकाता    968.00 रुपये    
पटना         1,031.50 रुपये    
बेंगलुरु    944.50 रुपये    
राजकोट    947.00 रुपये    
जोधपुर    949.00 रुपये    
जयपुर    945.50 रुपये    

हेही वाचा : दिवाळीआधीच सोनं-चांदी स्वस्त! चांदी 8,300 रुपयांनी कोसळली, किंमती 11 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर, पाहा आजचे सोनं चांदीचे दर

तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती :

दिल्ली    2,810.00 रुपये
नोएडा    2,747.50 रुपये
मुंबई            2,764.50 रुपये
कोलकाता    2,954.00 रुपये
पटना     3,100.50 रुपये
बेंगलुरु    2,764.00 रुपये
राजकोट    2,795.00 रुपये
जोधपुर    2,852.00 रुपये
जयपुर    2,839.00 रुपये
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES