मागील अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील सर्वात पहिला स्टील पूल हा ठाण्यात तयार करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील दिवे-अंजूर गावाजवळ असलेल्या नाशिक महामार्गावर म्हणेजच एनएच 3 हा पूल उभारण्यात आला आहे. एनएच 3 वर बुलेट ट्रेनसाठी उभारण्यात आलेल्या या पुलाची लांबी 100 मीटर असून वजन तब्बल 1405 टन आहे. महामार्गावर उभारण्यात आलेल्या या पुलामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी देशात अत्याधुनिक आणि मोठ्या आकाराच्या स्टील संरचना तयार करण्याची झाली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 28 स्टील पूल उभारण्यात येणार आहे. यापैकी एकूण बुलेट ट्रेनच्या 16 पुलांचे काम पूर्ण झाले असून ठाण्यात पुलाची निर्मिती तामिळनाडूच्या त्रिची येथील कार्यशाळेत करण्यात आली आहे. जवळपास 1300 किलोमीटर दूर तयार झालेली ही पुलाची संरचना एका विशेष ट्रेलरद्वारे महाराष्ट्रात आणण्यात आली आहे. त्यानंतर मग प्रत्यक्ष ठिकाण्यावर आल्यावर सादर पुलाची जोडणी करण्यात आली आहे.
बुलेट ट्रेन करता उभारण्यात आलेल्या या पुलाच्या निर्मितीसाठी स्टीलचे कटिंग, छिद्र पाडणे, वेल्डिंग आणि रंगकाम अत्यंत अचूक पद्धतीने करण्यात आलं असून यात वापरण्यात आलेल्या स्टीलच्या प्रत्येक तुकड्याची अल्ट्रासोनिक टेस्टिंगद्वारे तपासणी करण्यात आली आहे. वेल्डिंग करणाऱ्या कर्मचारी आणि पर्यवेक्षकांचे प्रमाणपत्र तपासण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही अडथळ्याशिवाय बुलेट ट्रेनची उन्नत मार्गिका तयार करण्याचा महत्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.
वाहतूक बंदीदरम्यान रात्री करण्यात आलेली कामं :
जोडणीसाठी टॉर शिअर प्रकारच्या मजबूत बोल्टचा वापर केला. पुलाचे आयुष्य वाढवण्यासाठी विशेष रंगाचा थर दिला. कंपन कमी होण्यासाठी विशेष बेअरिंग बसवले. पूल अंतिम ठिकाणी नेण्यासाठी दोन मोठे जॅक वापरले. सुरळीत वाहतुक राहावी म्हणून सदर कामं ही रात्रीच्या वाहतूकबंदीत करण्यात आली.
कशी झाली पुलाची उभारणी :
जमिनीपासून उंचीवर जोडणी - 17.5 मीटर
स्किड व्यवस्था - 22
टॉर-शिअर बोल्ट - 54,076
जॅकची संख्या - 2
प्रत्येक जॅकची क्षमता - 150 टन
दोन्ही जॅकची एकूण क्षमता - 300 टन