SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल ठाण्यात!

ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर गावाजवळ असलेल्या नाशिक महामार्गावर लेट ट्रेन प्रकल्पासाठी पूल उभारण्यात आला आहे. ठाण्यात पुलाची निर्मिती तामिळनाडूच्या त्रिची येथील कार्यशाळेत करण्यात आली आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Sep 30, 2026, 12:06 PM IST | Updated: Sep 30, 2026, 12:14 PM IST
Join

मागील अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील सर्वात पहिला स्टील पूल हा ठाण्यात तयार करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील दिवे-अंजूर गावाजवळ असलेल्या नाशिक महामार्गावर म्हणेजच एनएच 3 हा पूल उभारण्यात आला आहे. एनएच 3 वर बुलेट ट्रेनसाठी उभारण्यात आलेल्या या पुलाची लांबी 100 मीटर असून वजन तब्बल 1405 टन आहे. महामार्गावर उभारण्यात आलेल्या या पुलामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी देशात अत्याधुनिक आणि मोठ्या आकाराच्या स्टील संरचना तयार करण्याची झाली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 28 स्टील पूल उभारण्यात येणार आहे. यापैकी एकूण बुलेट ट्रेनच्या 16 पुलांचे काम पूर्ण झाले असून ठाण्यात पुलाची निर्मिती तामिळनाडूच्या त्रिची येथील कार्यशाळेत करण्यात आली आहे. जवळपास 1300 किलोमीटर दूर तयार झालेली ही पुलाची संरचना  एका विशेष ट्रेलरद्वारे महाराष्ट्रात आणण्यात आली आहे. त्यानंतर मग प्रत्यक्ष ठिकाण्यावर आल्यावर सादर पुलाची जोडणी करण्यात आली आहे.

बुलेट ट्रेन करता उभारण्यात आलेल्या या पुलाच्या निर्मितीसाठी स्टीलचे कटिंग, छिद्र पाडणे, वेल्डिंग आणि रंगकाम अत्यंत अचूक पद्धतीने करण्यात आलं असून यात वापरण्यात आलेल्या स्टीलच्या प्रत्येक तुकड्याची अल्ट्रासोनिक टेस्टिंगद्वारे तपासणी करण्यात आली आहे. वेल्डिंग करणाऱ्या कर्मचारी आणि पर्यवेक्षकांचे प्रमाणपत्र तपासण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही अडथळ्याशिवाय बुलेट ट्रेनची उन्नत मार्गिका तयार करण्याचा महत्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.

वाहतूक बंदीदरम्यान रात्री करण्यात आलेली कामं :

जोडणीसाठी टॉर शिअर प्रकारच्या मजबूत बोल्टचा वापर केला. पुलाचे आयुष्य वाढवण्यासाठी विशेष रंगाचा थर दिला. कंपन कमी होण्यासाठी विशेष बेअरिंग बसवले. पूल अंतिम ठिकाणी नेण्यासाठी दोन मोठे जॅक वापरले. सुरळीत वाहतुक राहावी म्हणून सदर कामं ही रात्रीच्या वाहतूकबंदीत करण्यात आली.

कशी झाली पुलाची उभारणी :

जमिनीपासून उंचीवर जोडणी -  17.5 मीटर
स्किड व्यवस्था - 22 
टॉर-शिअर बोल्ट - 54,076
जॅकची संख्या -  2
प्रत्येक जॅकची क्षमता - 150 टन
दोन्ही जॅकची एकूण क्षमता - 300 टन

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES