SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

एकीकडे दुष्काळाच्या झळा तर दुसरीकडे कर्जवसुलीचा फास, हिंगोलीच्या मजुरांवर दुहेरी संकट, राहत्या घराबाहेर लावले विक्रीचे फलक

Hingoli News : महाराष्ट्रात एकीकडे दुष्काळाचं भयानक संकट असताना दुसरीकडे शेतकरी आणि मजुरांच्यावर कर्जवसुलीचा फास घट्ट होऊ लागला आहे. हिंगोलीत मजुरांनी कर्ज न फेडता येत असल्याने स्वतःच्या राहत्या घरावर विक्रीचे फलक लावले आहेत.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 31, 2026, 08:00 AM IST | Updated: Oct 31, 2026, 08:15 AM IST
Image Credit: एकीकडे दुष्काळाच्या झळा तर दुसरीकडे कर्जवसुलीचा फास
Join

गजानन वाणी, (प्रतिनिधी) हिंगोली : अपुऱ्या पावसामुळे सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेकांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. दुष्काळाने हातचं काम हिरावलं असतानाच आता एकीकडे कर्जाच्या हप्त्यांनी देखील लोकांचं जगणंही मुश्किल केलंय. हिंगोलीच्या वाघजाळीत पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी मिळत नाही आणि अशातच शेतकऱ्यांच्या मागे कर्जवसुलीचा तगादा काही थांबत नाहीये. या दुहेरी संकटाने हतबल झालेल्या मजुरांनी चक्क आपल्या घरांवरच घर विकणे आहे असे फलक लावलेत. एका कुटुंबाची नव्हे, तर गावातील दहा कुटुंबांची ही व्यथा आहे. पाहूया दुष्काळ आणि कर्जाच्या कचाट्यात सापडलेल्या मजुरांची ही विदारक कहाणी.

एका बाजूला दुष्काळाच्या झळा तर तर दुसऱ्या बाजूला कर्जवसुलीचा फास, हिंगोलीच्या वाघजाळीत मजुरांवर दुहेरी संकट ओढवलंय आहे. पावसाअभावी शेतीची पिकं करपली मजुरीची कामंही बंद झाली. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही आणि अशा परिस्थितीत कर्जाचे हप्ते फेडायचे तरी कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

हेही वाचा : 'शेतकऱ्यांचे लचके तोडण्याची...', ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल; संजय गायकवाडांचा 'लांडगा' असा उल्लेख करत म्हणाले, 'विधान भवनाबाहेर...'
 

यापैकी एक समाधान मोरे हे व्यक्ती आहेत. रोजंदारीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या समाधान यांच्यावर 5 जणांच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. पण सध्या त्यांच्या हाताला काम नाही. मायक्रो फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाचे हप्तेही थकलेत.पूर्वी दर पंधरा दिवसांनी हप्ते भरले जायचे.मात्र दुष्काळाने रोजगार हिरावला आणि कर्जफेडीचं गणित पूर्ण बिघडलं. त्यातच वसुलीचा तगादा सुरू झाला. एजंट घरासमोर येऊन बसतात. पैशांसाठी दबाव टाकतात. लोकांसमोर अपमान सहन करावा लागतो अशी मजुरांची व्यथा आहे. या रोजच्या मानसिक त्रासाला कंटाळून समाधान मोरे यांनी आपल्या घरावरच घर विकणे आहे असा फलक लावला आहे. कर्ज फेडण्यासाठी आता घर विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.  ही केवळ समाधान मोरेंची कहाणी नाही. वाघजाळीतील जवळपास दहा कुटुंबांवर अशीच वेळ आली आहे.

दुष्काळाने रोजगार हिरावला, कर्जाने जगणं अवघड केलं आणि वसुलीच्या दबावाने घर विकण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडलं. या प्रकरणावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेनेही संताप व्यक्त केलाय. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुलीवर नियंत्रण आणावं. वाघजाळीसह हिंगोली जिल्ह्यात दुष्काळी पॅकेज जाहीर करावं. तसेच बेरोजगार मजुरांच्या हाताला काम द्यावं अशी मागणी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी केली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES