• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'शेतकऱ्यांचे लचके तोडण्याची...', ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल; संजय गायकवाडांचा 'लांडगा' असा उल्लेख करत म्हणाले, 'विधान भवनाबाहेर...'

'शेतकऱ्यांचे लचके तोडण्याची...', ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल; संजय गायकवाडांचा 'लांडगा' असा उल्लेख करत म्हणाले, 'विधान भवनाबाहेर...'

"मिंधे यांनी आमदार, खासदार पाळले नसून ‘लांडगे’ पाळले आहेत. त्यामुळे ते स्वतःही लचके तोडत आहेत व ‘शेतकऱ्यांचे लचके तोडा’ असे जंगली प्राण्यांना बजावत आहेत."

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 31, 2026, 06:29 AM IST|Updated: Oct 31, 2026, 06:49 AM IST
joinshare
'शेतकऱ्यांचे लचके तोडण्याची...', ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल; संजय गायकवाडांचा 'लांडगा' असा उल्लेख करत म्हणाले, 'विधान भवनाबाहेर...'
Image Credit: संजय गायकवाडांवर साधला निशाणा (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
घरासमोरच्या कार पार्किंगवरुन वाद! 22 सेकंदात एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं; थरार Video मध्ये कैद

घरासमोरच्या कार पार्किंगवरुन वाद! 22 सेकंदात एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं; थरार Video मध्ये कैद

2

आजचे राशीभविष्य 31 ऑक्टोबर 2026 : ऑक्टोबरचा शेवटचा शनिवार या राशीचे लोक वाहन किंवा घर खरेदीचे स्वप्न करणार पूर्ण, तर यांनी घ्यावी काळजी

3

'शेतकऱ्यांचे लचके तोडण्याची...', ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल; संजय गायकवाडांचा 'लांडगा' असा उल्लेख करत म्हणाले, 'विधान भवनाबाहेर...'

4

एल निनोनंतर लगेच ला निना येणार? जगाच्या हवामानात मोठ्या बदलांची शक्यता; भारताच्या मान्सूनवर काय परिणाम?

5

'वैभव आणि अभिषेक शर्माला वनडेत संधी द्या', माजी क्रिकेटर युवराज सिंगने दिला सिलेक्टर्सला सल्ला

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्हीच खरे वारसदार वगैरे असल्याच्या थापा ‘मिंधे’ सेनेचे लोक मारत असतात. बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्ववादाचे सेनापती होतेच, तरीही मानवता धर्म हा सर्व धर्मांच्या वर असल्याचे ते सांगत. या मानवता धर्माचाच गळा घोटण्याचे काम ‘मिंधे’ सेनेचे लोक करत असतात. मिंधे पक्षाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ, त्यात होरपळलेला शेतकरी आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. त्यांनी केलेली विधाने महाराष्ट्राच्या मानवी संस्पृतीला काळिमा फासणारी आहेत," असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. "मिंधे यांचे हस्तक आमदार संजय गायकवाड अत्यंत निर्घृणपणे म्हणाले, ‘‘आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्काराला कोणी जाऊ नये. त्यांच्या मृतदेहांचे लचके जनावरांनी तोडले तरच त्यांना धडा मिळेल व आत्महत्या थांबतील.’’ आमदार गायकवाड यांनी असले अमानुष संशोधन मांडून भारताच्या शेतकऱ्यांना कोणता ‘चैतन्य’ मंत्र दिला? या संशोधनाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस हे गायकवाडसारख्यांना ‘कृषिभूषण’ पुरस्कार देतात की पंतप्रधान मोदी त्यांना ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित करतात, एवढेच आता पाहायचे," असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लगाव्यात आला आहे. 

सरकारचे हे अपयश

"गायकवाड यांचे वक्तव्य दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनेवर मीठ चोळणारे आहे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांची थट्टा उडवणारे आहे. शेतकऱ्यांचे मृतदेह जनावरांनी खावेत अशी इच्छा व्यक्त करणारा आमदार हा नराधमी वृत्तीचाच असू शकतो. गायकवाड यांनी त्यांच्या पक्षाचे विकृत चरित्रच लोकांसमोर मांडले. ठाण्यात पूर्णेकरांचे हत्याकांड करणाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे व बुलढाण्यात गायकवाडसारखे आमदार शेतकऱ्यांची प्रेते जनावरांना खाऊ घालत आहेत. पुन्हा हेच लोक ‘आम्हीच खरी शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार’ असेही बोंबलत फिरत आहेत. महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ आहे. पिकांची राखरांगोळी झाली आहे. कर्जाच्या ओझ्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सरकारची मदत म्हणजे घोषणांचे बुडबुडे आहेत. ते बुडबडेही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. महाराष्ट्रात रोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करीत आहेत. हजारो शेतकऱ्यांनी तीन वर्षांत आत्महत्या केल्या. महायुती म्हणवून घेणाऱ्या सरकारचे हे अपयश आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. 

50-50 कोटींचा माज आणि अहंकार

"या संकटावर मात करणे व त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती फडणवीस सरकारकडे दिसत नाही. उलट सत्ताधारी आमदार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाच दोष देत आहेत. ‘‘त्यांची प्रेते जनावरांना खाऊ द्या,’’ असे सैतानी उपदेश करून सरकारची संवेदना ठार मेल्याचे सिद्ध करीत आहेत. गुरांच्या चारापाण्याचा प्रश्न बिकट होत आहे, पण हिंसक जनावरांना शेतकऱ्यांची प्रेते खाऊ घाला असे सांगून मिंधे गटाचे आमदार जंगली प्राण्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करीत आहेत. यावरून एक स्पष्ट होते, मिंधे यांनी आमदार, खासदार पाळले नसून ‘लांडगे’ पाळले आहेत. त्यामुळे ते स्वतःही लचके तोडत आहेत व ‘शेतकऱ्यांचे लचके तोडा’ असे जंगली प्राण्यांना बजावत आहेत. यापूर्वीदेखील आमदार गायकवाडांनी त्यांच्या हिंसक वृत्तीचे उद्योग अनेक प्रसंगी दाखवले आहेत. ‘डाळ’ थंड आहे म्हणून आमदार निवासात दंगल करणारे हेच महाशय होते. संजय गायकवाड वगैरे आमदारांची भाषा म्हणजे 50-50 कोटींचा माज आणि अहंकार आहे," असा उल्लेख अग्रलेखात आहे. 

ही भाषा फडणवीस यांना मान्य आहे काय?

"बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि राजकारणाचा केंद्रबिंदू सामान्य कष्टकरी माणूस होता. तो मुंबईतला कामगार होता व शेतात राबणारा शेतकरी होता. या कष्टकऱ्यांना स्वाभिमानाने जगता यावे व मरणानंतरही कष्टकऱ्यांचा सन्मान राहावा ही शिवसेनाप्रमुखांची भूमिका होती. आज शेतकरी जिवंतपणी आणि मरणानंतरही अपमानच सहन करत आहेत व आता तर मृत्यूनंतर त्यांची प्रेते लांडग्यांनी खावीत अशी इच्छा संजय गायकवाड या मिंध्यांच्या आमदारांनी व्यक्त केली. हा उपदेश क्रूर आहे. एका बाजूला आम्हीच शेतकऱ्यांचे ‘मदतगार’ हे दाखवण्यासाठी दुष्काळी भागात अन्नधान्याचे ट्रक पाठवून ‘फोटोगिरी’ करायची व त्याच वेळी शेतकऱ्यांचे लचके तोडण्याची भाषा करायची. आमदार गायकवाड यांना एकतर पद्मभूषण पुरस्कार द्या, कृषिभूषण द्या, नाहीतर मग आपण शेतकऱ्यांचा सन्मान राखतो हे सिद्ध करण्यासाठी या लांडग्यालाच विधान भवनाबाहेर जोड्याने मारा. शेतकऱ्यांचे लचके तोडण्याची भाषा फडणवीस यांना मान्य आहे काय?" असा सवाल लेखाच्या शेवटी विचारण्यात आला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Uddhav Thackeray
Eknath Shinde
Maharashtra Politics