• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /शिंदेच्या शिवसेनेतील 1175 जणांनी एकाचवेळी पक्ष सोडला; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

शिंदेच्या शिवसेनेतील 1175 जणांनी एकाचवेळी पक्ष सोडला; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

एकनाथ शिंदे यांच्या शिंदेच्या शिवसेनेतील 1175 जणांनी एकाचवेळी पक्ष सोडला आहे. हे सर्वजण कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची जोरदार र्चचा रंगली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 09, 2026, 23:23 IST|Updated: Nov 09, 2026, 23:28 IST
joinshare
शिंदेच्या शिवसेनेतील 1175 जणांनी एकाचवेळी पक्ष सोडला; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

एकनाथ शिंदे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अंतर्गत वाद उफाळून आला आहे. शिंदेच्या शिवसेनेतील 1175 जणांनी एकाचवेळी पक्ष सोडला आहे.  शिवसेनेचे 100 शाखाप्रमुख, 75 पदाधिकारी आणि 1,000 शिवसैनिकांचा यात समावेश आहे. आता हे सर्व जण कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा रंगली आहे. 

जालना जिल्ह्यातील  शिवसेनेचे 100 शाखाप्रमुख,75 पदाधिकाऱ्यांसह 1,000 शिवसैनिकांचा एकाचवेळी सामूहिक राजीनामा दिला आहे. या सर्वांनी आपला राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

जालना जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.  जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील हे सर्व पदाधिकारी आहेत.  100 शाखाप्रमुख, शिवसेना तालुका प्रमुख यांच्यासह 75 पदाधिकारी तसेच 1 हजार शिवसैनिकांनी राजीनामा दिला आहे. जिल्हा प्रमुख ए.जे.बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर सर्वजण नाराज आहेत. यामुळचे सर्वांनी  पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

मंठा तालुका का मंठा परतूर विधानसभा मतदारसंघात येतो. पक्षांतर्गत वादामुळे 1175 जणांनी राजीनाम दिला आहे. यात शाखाप्रमुख, तालुका प्रमुखांसह सर्व पदाधिकाऱ्यांचा तसेच कार्यकर्त्यांचा सामवेश आहे. सर्वांनी सामूहिक राजीनामा दिल्याने शिंदेच्या शिवसेनेची  मंठा परतूर विधानसभा मतदारसंघातील ताकद कमी होणार आहे. 

शिवसेनेतील 1175 जणांनी एकाचवेळी सामूहिक राजीनामा का दिला?

शिवसेनेतील 1175 जणांनी सामूहिकरित्या राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख ए. जे बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाजार होऊन सर्व पदाधिकार्यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती समोर आली आहे.  विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ए. जे. बोराडे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर त्यांना पक्षाचे जिल्हाप्रमुख करण्यात आले. 

इथूनच स्थानिक वादाला सुरुवात झाली.  ए. जे बोराडे पक्षाचे सर्व कार्यक्रम पदाधिकाऱ्यांना डावलून करत आहेत. त्यामुळं जिल्हाप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर सर्वच जण नाराज आहेत. ही नाराजी उफाळून आल्याने  तालुकाप्रमुखासह सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक रित्या राजीनामा देत शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

शिवसेनेतील 1175 जणांनी एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याआधी पक्षाला मोठा धक्का बसला. 8 नोव्हेंबर 2026 रोजी शिवसेनेतील 1175 जणांनी राजीनामा दिला. यानंतर दुसऱ्यांच दिवशी 9 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर आले. पत्रकारांनी याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी यावर भाष्य करणे टाळले. सामूहिक राजीनामा दिल्यानंतर पुढची भूमिका काय असेल याबद्दल शिवसेना  तालुकाप्रमुख उदय बोराडे यांना विचारले असता त्यांनी काहीच सांगितलेले नाही. लवकरच पुढचा निर्णय जाहीर करु असले ते म्हणाले. शिवसेनेचा राजीनामा देणारे 1175 पदाधिकारी कोणत्या पक्षात प्रवेश करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हे सर्व जण ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करु शकतात अशी चर्चा रंगली आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
shiv sena
Eknath Shinde
Maharashtra Politics
Political News