)
Nashik : नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण...एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा...आरोपी निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी गुन्हा...जलील यांच्याविरोधात पुरावे असल्यानं कारवाई
राज्यातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने सण अग्रिमाची मर्यादा वाढवून २० हजार रुपये केली आहे. या निर्णयामुळे दिवाळीसह विविध दहा सणांच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.राज्याच्या वित्त विभागाने गुरुवारी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. त्यानुसार, १ जानेवारी २००६ पासून सुधारित केलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ४,८०० रुपयांपेक्षा अधिक नाही, अशा कर्मचाऱ्यांना २० हजार रुपयांचा सण अग्रिम घेता येणार आहे.या निर्णयानुसार दिवाळी, रमजान ईद, नाताळ, पारशी नववर्ष, संवत्सरी, रोश होशनाह, बुद्ध जयंती, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणांसाठी अग्रिम घेता येणार आहे.
Kolhapur : ऊस दरासाठी सुरु असलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय... पुणे- बंगळुरू महामार्गावर 61 तासांपासून चक्काजाम आंदोलन सुरू होतं... काल कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफांच्या नेतृत्वात ऊस दराबाबत बैठक पार पडली.. या बैठकीत 3 हजार 900 रुपये पहिली उचल आणि कारखाना सुरू झाल्यानंतर 100 रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला.. तसंच साखरेला 4 हजार 500 रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाल्यास आणखी 200 रुपये देण्याची तयारी दर्शवली... रात्री उशिरा याबाबत निर्णय घेण्यात आला असून राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय... राजू शेट्टी यांची ऊसाल 4 हजार 200 रुपय दर देण्याची मागणी होती... अखेर काल पार पडलेल्या बैठकी तोडगा निघाला असून 3900+100+200 रुपयांचा फॉर्म्युला मान्य करण्यात आला....
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Maharashtra Breaking News LIVE : 06 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE Updates today Mumbai Pune National Political Latest Marathi Batmya Latest News In marathi Sports Bollywood latest news in marathi.