src="https://cdn.ampproject.org/v0/amp-bind-0.1.js">
SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मुंबई लोकलनंतर आता मेट्रो स्थानकावरही छठपूजेची गाणी? व्हिडीओ व्हायरल; मराठी-अमराठी वाद पुन्हा चर्चेत

मुंबईतील लोकल स्थानकांवरील भोजपुरी गाण्यांच्या वादानंतर आता मेट्रो स्थानकावरही छठपूजेचे गाणे वाजल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊया.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 13, 2026, 21:45 IST | Updated: Nov 13, 2026, 21:56 IST
Image Credit: मेट्रो स्थानकात छठपुजेची गाणी
Join

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपूजेची भोजपुरी गाणी वाजवल्यामुळे राजकारण चांगलंच तापलंय. याप्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतापले असून त्यांनी भाजपला चांगलंच सुनावलंय. यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना चॅलेंज दिलंय. या गाण्यावरुन निर्माण झालेला वाद अद्याप शांत झालेला नसतानाच आता मेट्रो स्थानकावरील एका व्हिडीओ समोर आलाय. मेट्रो स्थानकावर छठपूजेचे गाणे वाजत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ध्वनिक्षेपकांचा वापर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी करावा का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

रेल्वे स्थानकांवरील गाण्यांमुळे आधीच वाद

याआधी मुंबईतील वडाळा, सानपाडा, आंबिवली, नेरूळ यांसह काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचे व्हिडीओ समोर आले होते. भाऊबीजेच्या दिवशी हे गाणे ऐकू आल्याने काही मराठी प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील सणांच्या वेळीही स्थानकांवर मराठी गाणी वाजवली जातात का, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आला. काही राजकीय पक्ष आणि मराठी संघटनांनीही रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर आक्षेप घेतला.

मध्य रेल्वेने काय स्पष्टीकरण दिले?

रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजल्यानंतर रेल्वे प्रशासनावर चहुबाजून टीका केली. या वादावर मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती. स्थानकांवर विविध प्रसंगांनुसार विषयाधारित जिंगल्स आणि जनजागृतीपर संदेश प्रसारित केले जातात, असे त्यांनी सांगितले. छठपूजेच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या चालवल्या जात असल्याने काही स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्यात आली. मात्र, प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या रेल्वे उद्घोषणांचा वेळ बाजूला ठेवून उपलब्ध अतिरिक्त वेळेतच ही गाणी वाजवली जात असल्याचा दावा रेल्वेने केला होता.

काय म्हणाले राज ठाकरे?

बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , तर शांत आहोत म्हणजे गां* नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे. उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत. आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते. येथे मरहट्टे राहातात ते, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.


छठ पुजा वादात सोनू सुदची एन्ट्री

छटपूजेवरुन मुंबईत सुरु असलेल्या वादात आता अभिनेता सोनू सूद यांनीही उडी घेतलीये. मुंबईती जुहू बीचवर छटपूजा साजरी करण्यास मनसेनं विरोध केला असताना आता  15 नोव्हेंबरला संध्याकाळी छटपूजेसाठी जुहू बीचवर येणार असून छटपूजा साजरी करणार असल्याचं सोनू सूदनं म्हटलंय. याबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय.  त्यामुळे यावरुन आता वाद रंगण्याची शक्यता आहे.


मेट्रो प्रशासनाची भूमिका काय?

मेट्रो स्थानकावरील व्हायरल व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर संबंधित मेट्रो प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. गाणे कोणत्या स्थानकावर वाजवण्यात आले, ते अधिकृत कार्यक्रमाचा भाग होते की अन्य कारणामुळे प्रसारित झाले, हे या व्हिडीओतून स्पष्ट होत नाही. दरम्यान रेल्वे स्थानकांवरील गाण्यांबाबत मध्य रेल्वेने स्पष्टीकरण दिले. त्यानंतर आता मेट्रो प्रशासन काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related News

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES