SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'शरद पवार आणि सुनेत्रा पवार मला...,' NCP विलीनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले 'आता...'

राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर चर्चा रंगली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य केलं आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 10, 2026, 13:32 IST | Updated: Nov 10, 2026, 13:37 IST
Image Credit: NCP विलीनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान
Join

राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर चर्चा रंगली असून दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून समर्थनार्थ आणि विरोधात विधानं केली जात आहेत. यादरम्यान आता  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांना माहिती आहे. मर्जर होणार असेल तर ते मला सांगतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं. अजित पवार तावून सुलाखून निघालेले होते. सुनेत्रा पवार आता आलेल्या आहेत, त्यांच्यात सुधारणा होत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.  

यावेळी त्यांनी गोकुळ अध्यक्ष निवडीवरही भाष्य केलं आहे. गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे आहे. गोकुळ संदर्भात आधीही सांगितलं की, एका प्रकारे वैधानिक पेच निर्माण झाला. कोरम पूर्ण होत नव्हता. एकाच्या भरोश्यावर अध्यक्ष होऊ शकत नव्हता. डीडीआर पण असतो, मात्र कोरमसाठी बहुमत नाही लक्षात आल्यावर निर्णय झाला आहे. मी संस्थेच्या पाठीशी आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा - NCP चं विलीनीकरण होणार की नाही? तटकरेंनी थेट अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरुन सांगितलं, म्हणाले 'सुनेत्रा वहिनी आणि शरद पवार....'

"मी कायद्याच्या आणि संस्थेच्या बाजूने आहे. चंदगडचे राजेश पाटील यांना अध्यक्ष पदाची उमेदवारी दिली असल्याचे समजते. वैधानिक पेच निर्माण झाला. 14 चा कोरम कुणीही गाठू शकत नव्हतं. सरकारला कब्जा घ्यायचा असते तर अगोदरच घेतला असता. दोघांकडे कोरम नसल्याने 4 लोकं टाकली आहेत. हायकोर्टाने अंतिम निकालापर्यंत चार लोकांची मते ठेवायला सांगितली आहेत. बंटी पाटील, मुश्रीफ आणि सावकार यांनी एकत्रित बसण्यास सांगितले होते. पाच हजार मतदारांच्या संस्थेत राहूल गांधी उतरले. सहकार क्षेत्रातील चारही जणांचा अनुभव आहे. गायनॅकॅालिजिस्टने सहकारात जावू नये का? देशातील विरोधी पक्षनेता लक्ष घालतोय तर गायनॅकोलॅाजिस्ट का नाही," असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

"दुष्काळाचं संकट मोठ्या प्रमाणात आहे. संकट मोठं आहे यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचं काम आपण करत आहोत. शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली बरं वाटलं. संकटात उभं राहण्याची जिद्द मला दिसली. एक एक गावाला पाणी कसं दिलं जाईल याचा आम्ही अभ्यास करत आहोत. आजूबाजूच्या परिसरातून पाण्याचं नियोजन करतोय. जनावरांना पाणी देण्याची व्यवस्था करतोय . चारा नियोजनात आम्ही तालुका आणि जिल्हा पातळीवर नियोजन करतोय," अशी माहिती त्यांनी दिली.

विविध नविन फटाके निर्माण केले जातायत. पण यावर आता गंभीर विचार करावा लागेल अशी भूमिकाही त्यांनी वाटली आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES