• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /दिवाळी Insta रीलची हौस पडली महागात; 21 वर्षीय तरुणाला 74 टाके! ही चूक तुम्ही करु नका, डॉक्टरांचं आवाहन

दिवाळी Insta रीलची हौस पडली महागात; 21 वर्षीय तरुणाला 74 टाके! ही चूक तुम्ही करु नका, डॉक्टरांचं आवाहन

दिवाळीमध्ये तुम्ही अनेक अपघातांबद्दल ऐकलं असेल, सोशल मीडियावर पाहिलं असेल किंवा पेपरमध्ये वाचलं असेल. मात्र त्याहून अगदी विचित्र प्रकार समोर आला असून या अपघातामध्ये एकजण गंभीर जखमी झालाय. त्याबद्दलच...

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 12, 2026, 14:24 IST|Updated: Nov 12, 2026, 14:39 IST
joinshare
दिवाळी Insta रीलची हौस पडली महागात; 21 वर्षीय तरुणाला 74 टाके! ही चूक तुम्ही करु नका, डॉक्टरांचं आवाहन
Image Credit: दोन रुग्णालयांना दाखल करुन घेण्यास दिला नकार (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - रॉयटर्सवरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याच्या घटना घडल्याचं यावर्षी दिसून आलं आहे. मुंबईत तर आगीच्या 500 हून घटना घडल्या आहेत. त्यातही आग लागण्याचं मुख्य कारण फटके ठरलं असून काही ठिकाणी लोक जखमीही झाले आहेत. असाच एक विचित्र प्रकार वसई-विरारमधून समोर आला आहे. दिवाळीसाठी सोशल मीडियावर 'रील' बनवण्यासाठी व्हिडीओ शूट करताना हातात फटाका फोडण्याच्या नादात एक 21 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेत हा मुलगा एवढा गंभीर जखमी झाला की त्याला 72 टाके घालावे लागले आहेत.

उडणारा फटका हातात फोडण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरुणाचं नाव विनीतकुमार असून तो मधुबन बिल्डिंग परिसरात काम करतो. विनीतकुमार हा या ठिकाणी लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणजेच कंत्राटदार कामगार म्हणून काम करतो. दिवाळीनिमित्त तो सोशल मीडियावर रिल पोस्ट करण्याच्या उद्देशाने व्हिडीओ शूट करत होता. विनीतने आकाशात उडणारा 'स्कॉय-शॉट' प्रकाराचा फटका हातात धरुन पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र फटाका हातात धरुन ठेवल्याने तो उडण्याऐवजी हातातच फुटला. यामुळे मोठा स्फोट झाला आणि विनीतकुमारच्या हाताला मोठी दुखापत झाली.

72 टाके पडले, डॉक्टर काय म्हणाले?

या घटनेनंतर घाबरलेल्या विनीतकुमारचं कुटुंब घाबरुन गेलं. त्यांनी त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. फटाक्यामुळे अपघाताची केस असल्याने सुरुवातीला दोन रुग्णालयांनी विनीतकुमारला दाखल करून घेण्यास नकार दिला, परंतु अखेरीस पश्चिम वसईतील आप्पासाहेब थोरात रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी चार ते पाच तास अथक परिश्रम करून एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. विनीतकुमारवर शस्रक्रीया करणाऱ्या डॉ. प्रवीण थोरात यांनी रुग्णाच्या प्रकृतीला धोका नसल्याचं सांगितलं. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान विनीतकुमारच्या हातावर एकूण 72 टाके घालण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली करण्यात आलेल्या प्लास्टिक सर्जरीनंतर, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉ. थोरात म्हणाले.  दिवाळी साजरी करताना फटाके फोडण्याच्या नादात काहीही फाजील धाडस अथवा चूक करु नका असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.

रिलस्टारमुळे तीन एकरावरचा ऊस जळाला

दरम्यान, नांदेडमध्येही रीलच्या नादात एका शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या रीलस्टार्सचा फटका या शेतकऱ्याला बसला. रीलसाठी फटाके उडवताना फटाका शेतात पडून तीन एकरवरील ऊसाला आग लागली. नांदेड शहराजवळील मरळक येथे ही घटना घडली. शेतकरी माणिक शिंदे यांचा तीन एकरावरील ऊस हुल्लडबाज रिल्स स्टार्समुळे जळाला. दिवाळीच्या दिवशी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास ऊसासमोर रिल्स काढण्यासाठी काही मुलं मुली येथे आले होते, त्यांनी रिल्स काढण्यासाठी हजारो रुपयांच्या फटाके फोडून आतिषबाजी केली. त्यातलाच एक फटाका ऊसाच्या शेतात जाऊन पडला आणि 3 एकरावरील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी आणि या अज्ञात रिल्स स्टार्सचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Viral News
Mumbai