SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'शायना एनसी असू द्या किंवा कोणीही...', बाळासाहेबांचा फोटो फाडण्यावरील वादावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, 'त्यांचा अपमान...'

शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याने वाद निर्माण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 18, 2026, 17:53 IST | Updated: Nov 18, 2026, 18:01 IST
Image Credit: बाळासाहेबांचा फोटो फाडण्यावरील वादावर एकनाथ शिंदे झाले व्यक्त
Join

शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याने वाद निर्माण झाला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरुन त्यांची पाठराखण केली आहे. बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत आहे आणि त्यांचा अपमान कधीही होणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच शायना एनसी यांनी आपल्याकडे स्पष्टीकरण दिलं असून, मला फोटोही दाखवला आहे. त्या फोटोत मणिशंकर अय्यर यांचं तोंड फाटलं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी सावकरांचा अपमान कऱणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात एकही शब्द बोलत नाहीत म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला.

"बाळासाहेब आमचं दैवत आहे आणि त्यांचा अपमान कोणीही शिवसैनिक कधी करणार नाही. शायना एनसी यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. त्यांनी मला फोटोही दाखवला. बाळासाहेब मणिशंकर अय्यर यांना चप्पल जोडे मारतानाचा फोटो आहे, त्या फोटोत मणिशंकर अय्यरचं तोंड फाटलं आहे. बाळासाहेबांनी जोड्याने मारलं आणि यांचं तोंड फाडलं हा फोटो त्यांनी मला दाखवला. त्यामुळे शायना एनसी असू द्या किंवा मग कोणताही शिवसैनिक बाळासाहेबांचा अपमान करणार नाही. कारण ते आमचं दैवत आहे आणि त्यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. म्हणून तर जनेतेने आम्हाला स्विकारलं आहे. लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखल्याने खोटे आरोप करुन बदनाम करत असतील तर जनता सुज्ज्ञ आहे," असं त्यांनी सांगितंल आहे.

त्यांच्याकडे आता खोटं बोलण्यापलीकडे आणि राजकारण करण्यापलीकडे काय आहे? लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. राजकारण करण्यापेक्षा दुष्काळात जाऊन मदत केली पाहिजे असं ते म्हणाले आहे.

हे ही वाचा - 'मी एकदा नाही हजारदा...', बाळासाहेबांचा फोटो फाडल्याने वाद निर्माण झाल्यानंतर शायना एनसींची पोस्ट, 'हिंमत असेल तर...'; राऊतांचा संताप 'हे जिथे दिसतील...'

पुढे त्यांनी म्हटलं की, "सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांचा अपमान, माफी याचा उल्लेख आहे. त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. याआधी राहुल गांधींनीही वारंवार सावकरांचा अपमान केला, त्यांना माफीवीर म्हटलं. जाणुनबुजून त्यांनी हे पाप केलं. सोनिया गांधींनीही पुस्तकात सावकरांचा अपमान करणारी विधानं केली आहेत. यामुळे याचा निषेध शिवसेनेने केला आहे".

"स्वत:ला सावरकरवादी, हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे, सावकरांचा अपमान कऱणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं पाप करणारे हे सहन कसं करतात? निषेधाचं एक वाक्यही बोलत नाहीत? त्या पुस्तकाचा स्विकार केला आणि दोन पानं सावकरांच्या विरोधातील आहेत त्याबद्ध साधा ब्रही काढत नाहीत, निंदा करत नाहीत," अशी टीका त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर केली. सावरकरांचा अपमान कऱण्यात कौणती बौद्धिक दिवाळखोरी आणि मर्दानगी आहे? असा प्रश्न यावेळी त्यांनी काँग्रेसला विचारला.

 

 

सावकरांचा अपमान करणाऱ्यांनाही तीन वेळा जनतेने घरी बसवलं. तीन वेळा जनतेच्या न्यायालयात गेले असताना घरी बसवलं. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. ज्यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार बदलण्याचं काम केलं, सावकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत गेले त्यांची निंदा केली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES