• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /ठाकरेंचे दिवाळी सेलिब्रेशन! बहीण जयजयवंती ठाकरेंच्या घरी भाऊबीज

ठाकरेंचे दिवाळी सेलिब्रेशन! बहीण जयजयवंती ठाकरेंच्या घरी भाऊबीज

संपूर्ण ठाकरे कुंटबाने एकत्र येत दिवाळी साजरी केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही बहीण जयवंती ठाकरे यांच्या घरी गेले.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 11, 2026, 23:47 IST|Updated: Nov 12, 2026, 00:31 IST
joinshare
ठाकरेंचे दिवाळी सेलिब्रेशन! बहीण जयजयवंती ठाकरेंच्या घरी भाऊबीज

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळी : दिवाळी सणानिमित्ताने संपूर्ण ठाकरे फॅमिली एकत्र आली. भाऊबीजेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले.  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही बहीण जयजयवंती ठाकरे यांच्या घरी दाखल झाले. यावेळी  आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे  देखील उपस्थित होते. यावेळी संपूर्ण कुटुंबाने एकत्र हा सण साजरा केला. 

ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून महाराष्ट्रात यांच्या राजकीय भेटीची नेहमीच चर्चा असते. ठाकरे बंधूचे मनोमिलन झाल्यापासून कौंटुबिक भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे  एकत्रच भाऊबीजेसाठू बहिण  जयजयवंती ठाकरे यांच्या घरी पोहचले.  यावेळी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, उर्मिला ठाकरे यांच्यासह इतर नातेवाईक देखील उपस्थित होते. लाडक्या बहिणीने भावाचे औक्षण केले. अमित ठाकरे यांनी सोशल मिडियावर याचे काही क्षण शेअर केले आहेत. 

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची भाऊबीज

राज्याच्या राजकारणातील चर्चेत असलेली बहीण भावाची जोडी म्हणजे मुंडे बंधू भगिनी. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मुंबईत एकत्र भाऊबीज साजरी केली. हा कौटुंबिक सोहळा पंकजा मुंडे यांच्या मुंबईतील 'रामटेक' या शासकीय निवासस्थानी पार पडला. 

मंत्री पंकजा मुंडे यांनी दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या ऊसतोड मजुरांसोबत भाऊबीज साजरी केली. मावळ तालुक्यात साखर कारखान्यावरील ऊसतोड मजुरांसोबत त्यांनी भाऊबीज साजरी केली. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत अनेक कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यांच्यासोबत आपुलकीचे नाते अधिक घट्ट व्हावे, या भावनेतून यंदाची भाऊबीज पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगार व शेतकऱ्यांसोबत साजरी केली.

ठाकरे शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ठाकरे शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.  मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली.  मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि सदिच्छा भेट घेतली. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Raj Thackeray
Uddhav Thackeray
shiv sena
Shiv Sena UBT
Maharashtra Politics