• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मुंबईच्या बाणगंगेत छटपूजेवरुन वाद! बैठक सुरु असताना मनसेचा तुफान राडा, BMC म्हणालं 'तिथे छठपूजेसाठी...'

मुंबईच्या बाणगंगेत छटपूजेवरुन वाद! बैठक सुरु असताना मनसेचा तुफान राडा, BMC म्हणालं 'तिथे छठपूजेसाठी...'

मुंबईच्या बाणगंगेत छटपूजेवरुन वाद निर्माण झाला आहे. बाणगंगा इथं छटपूजेला मनसेनं तीव्र विरोध केला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 12, 2026, 22:10 IST|Updated: Nov 12, 2026, 22:18 IST
joinshare
मुंबईच्या बाणगंगेत छटपूजेवरुन वाद! बैठक सुरु असताना मनसेचा तुफान राडा, BMC म्हणालं 'तिथे छठपूजेसाठी...'
Image Credit: बाणगंगेत छटपूजेला मनसेचा विरोध

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईच्या बाणगंगेत छटपूजेवरुन वाद निर्माण झाला आहे. बाणगंगा इथं छटपूजेला मनसेनं तीव्र विरोध केला आहे. बाणगंगा इथं छटपूजा करु नये, तसंच छटपूजेसाठी परवानगीही नाही आहे, असं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं मनसेनं सांगितलं आहे. तर ही परवानगी मिळावी म्हणून काहींनी दबाव आणल्याचा आरोपही मनसेनं केला आहे.

डी वॉर्ड येथे भाजपाचे नगरसेवक आणि छठपूजा आयोजकांची सहाय्यक आयुक्तांसोबत बैठक झाली. मनसेने आधीच ही बैठक उधळून लावण्याचा इशारा दिला होता. बैठक सुरु असताना मनसेचे पदाधिकारी खाली विरोध करत होते. यादरम्यान ही बैठक संपवून नगरसेवक सन्नी सानप रवाना झाले.

यानंतर मनसेच्या पादाधिकाऱ्यांनी वॉर्ड ऑफिसरची भेट घेतली. या भेटीनंतर मनसेने सांगितलं की, "वॉर्ड ऑफिसरने स्पष्ट सांगितलं आहे की बाणगंगा येथे छट पूजेची परवानगी नाही. काही नेत्यांनी परवानगीसाठी दबाव आणला . मुंबई हायकोर्टाने गिरगाव चौपाटीवर बंदी आणली आहे. प्रशासन म्हणतंय की पाण्यात गेले की आम्ही काय करू... गणेश विसर्जनाच्या वेळी काय केलं?आम्ही रविवारी बाणगंगा येथे छट पूजा होऊ देणार नाही. स्थानिक आमदार वाद निर्माण करत आहेत. आधी मराठी गुजराती केला नंतर मराठी जैन केला आणि आता मराठी आणि उत्तरं भारतीय असा वाढनिर्माण करत आहेत". 

मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर थेट छटपूजेची गाणी

मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर थेट छटपूजेची गाणी वाजण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईत हार्बर मार्गावरील वडाळा, सानपाडा यासह मध्य रेल्वेच्या आंबिवली स्टेशनवर उद्घोषणा थांबवून छटपूजेची गाणी मोठ्या आवाजात वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. रेल्वे स्टेशनवर गाड्यांचं आगमन आणि प्रस्थान तसंच वेळापत्रकातील बदल आणि आपत्कालीन सूचना देण्यासाठी उद्घोषणा केल्या जातात.. त्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्म तसंच रेल्वे ब्रिजवर स्पीकर लावण्यात आलेत.. मात्र, बुधवारी रेल्वेच्या अनेक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठीच्या नियमित उद्घोषणा बंद करून त्याऐवजी चक्क मोठ्या आवाजात छटपूजेची गाणी वाजवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय.. रेल्वेच्या या मनमानी कारभाराविरोधात मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीने आक्षेप घेतला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Raj Thackeray
Marathi News