SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'देवेंद्र भाऊंचा 'देवेन भाई' झाला', मंत्रालय कॅन्टीनमधील गुजराती पदार्थांच्या एन्ट्रीवरुन वादाची फोडणी; राऊत म्हणाले, ''एकनाथ भाई', 'सुनेत्रा बेन' यांनी पुढील...'

मंत्रिमंडळाने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांनंतर सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयासहीत इतर दोन ठिकाणांवरील मेन्यू अपडेट केला असून नव्या मेन्यूमध्ये अनेक गुजरातील पदार्थांचा समावेश असला तरी यात कांदापोहे नाहीत.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 13, 2026, 11:15 IST | Updated: Nov 13, 2026, 11:39 IST
Image Credit: खोचक शब्दांमध्ये तिन्ही नेत्यांवर निशाणा (प्रातिनिधिक फोटो)
Join

मंत्रिमंडळामधील निर्णयानंतर सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयासहीत विधानभवन, कोकणभवनातील कॅन्टीनचा मेन्यू अपडेट केला असून अनेक गुजरातील पदार्थांना एन्ट्री देण्यात आली आहे. याच मुद्द्यावरुन राऊत यांनी खोचक पद्धतीने राज्य सरकारमधील तिन्ही प्रमुख नेत्यांना पुढची निवडणूक गुजरातमधून लढवण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रचं गुजरात होतंय नाही झालंय असं म्हणण्याची वेळ आल्याचा टोलाही राऊत यांनी लागवला आहे. 

नेमका काय निर्णय झालाय?

राज्य सरकारने मंत्रालय तसेच विधानभवनाच्या उपाहारगृहात पौष्टिक खाद्यपदार्थ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृतीला हानिकारक तळलेले, चटकदार खाद्यपदार्थ मेन्यूमधून बाद केल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या अपडेट करण्यात आलेल्या मंत्रालयाच्या नव्या मेन्यू कार्डमध्ये एकूण 54 पदार्थ आहेत. यामध्ये प्रामुख्याने गुजरातील पादर्थांची वर्णी लागल्याचं दिसत आहे. ज्यात मूग ढोकळा, पांढरा ढोकळ्यापासून अगदी कच्छी दाबेलीचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे कांदेपोह्यांना या मेन्यूत स्थान नाही. या उपहारगृहामध्ये उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय पदार्थांनाही विशेष स्थान देण्यात आलं आहे.

मराठी पदार्थांपैकी पुणेरी मिसळ, शेगाव कचोरी, शेवई उपमा, कोथिंबीर वडी अशा गोष्टी आता मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये मिळतील. मंत्रिमंडळामध्येच खाद्यपदार्थांसंदर्भात हा निर्णय झाला आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालय, विधानभवन आणि कोकणभवन येथील उपाहारगृहांसाठी नव्या खाद्यपदार्थाची यादी आणि त्यांचे दर निश्चित केले आहेत. मंत्रिमंडळ बैठक अथवा शासकीय बैठकींदरम्यान बटाटा वडा, भजी, समोसे असे तळलेले खाद्यपदार्थ देऊ नयेत. चहा, कॉफीऐवजी लेमन टी, ग्रीन टी द्यावा असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्याची अंमलबजावणी केली जाणार असून तसं मेन्यूकार्ड जारी करण्यात आलं आहे.

राऊत यांनी साधला निशाणा

मंत्रालयातील या बदलेल्या मेन्यूसंदर्भात पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला असता त्यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली. "महाराष्ट्राचं गुजरात करण्याचा प्रयत्न काय गुजरातच झालाय. देवेंद्र भाऊंचा 'देवेन भाई' झाला आहे. 'एकनाथ भाई', 'सुनेत्रा बेन' झाल्यात. मंत्रालयाचे गुजरात भवनसुद्धा होईल. सेंट्रल हॉलमध्ये संपूर्ण देशभराचे व्यंजन मिळत होते. आता फक्त गुजरातचे मिळते. ढोकळा, फाफडा, शेव गठिया, दाबेली, खांडवी मिळतात. महाराष्ट्राच्या मंत्रालयात देवेन भाई यांनी जर परवानगी दिली असेल तर त्यांनी पुढली निवडणूक गांधीनगरमधून लढावावी. एकनाथ भाईंनी बडोदरा आणि सुनेत्रा बेन यांनी एलिस गुजरातमधून निवडणूक लढवावी," असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES