• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'पक्ष वाढवणार आहात की संपवणार आहात?', एकनाथ शिंदे संतापले; मंत्र्यांना 'लवकर बदल करा...'

'पक्ष वाढवणार आहात की संपवणार आहात?', एकनाथ शिंदे संतापले; मंत्र्यांना 'लवकर बदल करा...'

शिवसेनेच्या आमदार, जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुखांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 10, 2026, 14:59 IST|Updated: Nov 10, 2026, 15:21 IST
joinshare
'पक्ष वाढवणार आहात की संपवणार आहात?', एकनाथ शिंदे संतापले; मंत्र्यांना 'लवकर बदल करा...'
Image Credit: शिंदे यांनी आपल्या पक्षातील पालकमंत्र्यांना खडेबोल सुनावले

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील पालकमंत्र्यांना खडेबोल सुनावले आहेत. तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे की संपवणार आहात? अशी संतप्त विचारणा त्यांनी केली आहे. पालकमंत्र्यांविरोधात आलेल्या तक्रारीनंतर एकनाथ शिंदे संतापले होते. पालकमंत्री पक्ष संघटनेच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी संबधितांना जाब विचारला. तसंच पक्ष संघटनेच्या कामात तातडीने बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.

नेमकं काय झालं?

शिवसेनेच्या आमदार, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुखांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पालकमंत्र्यांविरोधात तक्रारी करण्यात आल्या. तक्रारींनतर एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांना खडेबोल सुनावले असून पक्ष वाढणार आहात ही संपवणार आहात? अशी विचारणा करत कामात लवकर बदल करा हे योग्य नाही असे आदेश दिले.

पालकमंत्री पक्ष संघटनेच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली. पक्ष संघटनेला बळ देण्यासाठी पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यात प्रयत्न होत नसल्याची थेट तक्रार करण्यात आली. अनेक पालकमंत्री केवळ स्वतःच्या मतदारसंघापुरतेच मर्यादित असल्याची तक्रार शिंदेंकडे कऱण्यात आली.

जिल्ह्यात पक्ष संघटना वाढवायची कशी, असा पदाधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला. विविध जिल्ह्यांतील जिल्हाप्रमुख आणि उपजिल्हाप्रमुखांनी एकनाथ शिदेंकडे आपलं गाऱ्हाणं मांडंल. तक्रारींनंतर एकनाथ शिंदे संबंधित मंत्र्यांवर संतापले. पक्ष वाढवायचा आहे की संपवायचा आहे? अशा शब्दांत मंत्र्यांना खडेबोल पक्ष संघटनेच्या कामात तातडीने बदल करण्याचे मंत्र्यांना निर्देश दिले. 

दरम्यान एकनाथ शिंदे सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत असून सर्व मंत्री, नेत्यांना आणि शिवसैनिकांनाही थेट बांधावर जाऊन मदतीचा हात देण्यास सांगितलं आहे. जालन्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितलं की, मी तुमचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी आलो आहे. शिवसैनिकांनी फक्त शेतकऱ्यांना हात देण्याचं काम करायचं. 
मी तांगडे कुटुंबाच्या घरी गेलो होतो.त्यांच्या कुटुंबाचा मोठेपणा मोठा आहे. त्यांना 2 मुली आणि एक मुलगा आहे. त्यातील एका मुलीला पोलीस व्हायचं आहे. तिचा लग्नापर्यंतचा सगळा खर्च शिवसेना उचलेल. दुष्काळामुळे ज्या मुलीचे लग्न शेतकऱ्यांना करता येत नाही त्यांनी चिंता करू नका. त्या सगळ्या मुलीच्या नावाची यादी तयार करा शिवसेना सगळ्या मुलीची लग्न करेल असं त्यांनी जाहीर केलं.

शेतकऱ्यांना जे जे लागेल ते देण्याचं काम आम्ही करू. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांच्या खात्यात पैसे येतील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. तसंच लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं आश्वासनही दिलं आहे. 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Eknath Shinde
shiv sena