SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 20 ते 22 आमदार...', NCP विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठा गौप्यस्फोट, 'आज शरद पवारांना भेटून...'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा सुरु असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 11, 2026, 10:35 IST | Updated: Nov 11, 2026, 10:54 IST
Image Credit: 'अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून 20-22 आमदार बाहेर पडणार'; संजय राऊतांचा मोठा दावा
Join

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा सुरु असतानाच, आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदारानी शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. दरम्यान या भेटीमागे आमदारांची नाराजी असल्याचा मोठा दावा शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला आहे. सुनेत्रा पवारांचा जो पक्ष आहे त्यातील 20 ते 22 आमदार कधीही बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत असा गौप्यस्फोटच त्यांनी केली आहे. ते स्वगृही परतणार असल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे. तसंच अमित शाहांनी निर्माण केलेला हा पक्ष पुन्हा फुटेल असंही म्हटलं आहे. 

'अमित शाहांचा हा पक्ष पुन्हा एकदा फुटेल'

"मी याआधीही सांगितलं होतं की, सुनेत्रा पवारांचा म्हणजेच अमित शाहांचा पक्ष आहे त्यातील 20 ते 22 आमदार कधीही बाहेर पडतील. ते बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत. ते शरद पवारांना ते फक्त गप्पा मारण्यासाठी भेटत नाहीयेत. अजित पवारांचं नेतृत्व राहिलेलं नाही. एकाप्रकारे त्यांना गुलामी करावी लागत आहे, स्वाभिमान गहाण ठेवावा लागत आहे. अशा स्थितीत एक तर ते स्वगृही परततील, आणि त्याला विलीनीकरण म्हणत नाहीत. किंवा मग ते निवडणुकीच्या आधी एखाद दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील. पण अमित शाहांचा हा पक्ष पुन्हा एकदा फुटेल," असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

हे ही वाचा - NCP चं विलीनीकरण होणार की नाही? तटकरेंनी थेट अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरुन सांगितलं, म्हणाले 'सुनेत्रा वहिनी आणि शरद पवार....'

सुनेत्रा पवारांचा पक्ष हे भाजपाचं, अमित शाहांचं अंगवस्त्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात आम्हाला सांगितल्याशिवाय निर्णय होणार नाही असं सांगितलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, "ते सुनेत्रा पवारांना तसं सांगू शकतात. शरद पवारांसंदर्भात ही भूमिका नसेल. सुनेत्रा पवारांचा पक्ष हे भाजपाचं, अमित शाहांचं अंगवस्त्र आहे. त्यासंदर्भात ते निर्णय घेऊ शकतात. किंवा एकनाथ शिंदेंचा जो पक्ष आहे ते भाजपाचं अंगवस्त्र आहे. त्याबाबतीत ते निर्णय घेऊ शकतील. पण पण मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंच्या आणि  राष्ट्रवादी शरद पवारांच्या नेतृत्वात असून त्याबतीत ते निर्णय घेऊ शकत नाहीत". 
 

शरद पवारांच्या भेटीसाठी मागितली वेळ

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदारानी शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. आज बुधवारी भेटीसाठी वेळ मागिल्याची सूत्रांची माहिती आहे. नुकतंच पंकज भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती. सध्या शरद पवार मुंबईतच असून पुढील काही दिवस सिल्व्हर ओक निवासस्थानी आराम करणार असल्याची पवार कुटुंबीयांची माहिती आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES