• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /छगन भुजबळ यांचे नाव घेत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचा मोठा दावा; थेट दिल्लीतून पहिली प्रतिक्रिया

छगन भुजबळ यांचे नाव घेत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचा मोठा दावा; थेट दिल्लीतून पहिली प्रतिक्रिया

छगन भुजबळ यांचे नाव घेत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांनी मोठा दावा केला आहे. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 13, 2026, 18:19 IST|Updated: Nov 13, 2026, 18:25 IST
joinshare
छगन भुजबळ यांचे नाव घेत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचा मोठा दावा; थेट दिल्लीतून पहिली प्रतिक्रिया

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सुनील तटकरे : विलिनीकरणाची चर्चा असताना दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते दिल्लीत आहे. सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे दिल्लीत आहे. सुप्रिया सुळे संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीला हजेरी लावण्यासाठी दिल्लीत आल्या. तर तटकरे पटेल हे स्टँडिंग कमिटीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले.  तटकरे पेट्रोलियम नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत. मात्र, विलिनीकरणाच्या अनुषंगाने दिल्लीत  गाठीभेटी सुरु असल्याची चर्चा आहे.  राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत  सुनील तटकरे यांनी मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या नावाचा देखील उल्लेख केला. सुनील तटकरे  थेट दिल्लीतून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

छगन भुजबळ काय म्हणाले?

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मंत्री छगन भुजबळांनीही सकारात्मक प्रतिक्रीया दिली आहे. सध्या विलिनीकरणाचा खेळ सुरु आहे. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आनंदच होईल असं भुजबळ म्हणालेत. मात्र सरकार सोडणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे हे सर्व कसं जुळवून आणायचं हा जटील प्रश्न असला तरी जबाबदारी दिल्यास पुढाकार घेण्यात तयार असल्याचं भुजबळांनी म्हटल. अजित पवार जिवंत असते  12 फेब्रुवारी रोजीच राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले असते.  छगन भुजबळ यांनी विलिनीकरणाच्या बैठकांबद्दल केलेला दावा खरा असल्याचे तटकरेंनी म्हटले आहे. अजितदादांनी त्यांना याची पूर्वकल्पना दिली होती असेही ते म्हणाले.  

अजित पवार आणि जयंत पाटील यांची विलिनीकरणावर चर्चा झाल्याचा  दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. सुनील तटकरे यांनी भुजबळ यांचा हा दावा खरा असल्याचं म्हटलं आहे. मी एवढंच म्हणलो की 12 फेब्रुवारीला विलीनीकरण झाले असते, यामुळे वादळ निर्माण झाले. 

सुप्रिया ताई सुद्धा महत्वाच्या नेत्या आहेत. त्या बोलत आहेत ते खर आहे. विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू नाहीत असं म्हणत  तटकरे यांनी दुसरीकडे विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. 
पवार साहेबांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना भेटालया गेले होतो.  सुनेत्रा पवार यांनी सांगितले आहे, योग्य वेळी योग्य गोष्टी कळतील. प्रत्येकजण याचा अन्वयार्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठेही विलीनीकरणाच्या चर्चा नाहीत दादांच्या निधनानंतर या सगळ्या गोष्टी संपल्या आहेत, हे स्पष्ट आहे असही तटकरे म्हणाले. 

डिलिमिटेशन विधेयक येणार असेल या संदर्भात पवार साहेबांच्या पक्षाच्या मतदानाची आवश्यकता आहे का ? एक बाब खरी आहे की मतदानासाठी दोन तृतीयांश मतांची आवश्यकता असते.. या विधेयकाच्या बाजूने मतदान करायचे का नाही याचा निर्णय घ्यायचा सर्वस्वी अधिकारी पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करायला जाणे म्हणजे विलीनीकरणाच्या चर्चा करायला गेल्याचे म्हणणे हास्यास्पद आहे.

अर्थ विभाग, राज्यातील दुष्काळाची परिस्थिती यावर गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली. प्रफुल भाई आणि माझी नेहमीच चर्चा होत असते.  आमदारांसोबतच्या बैठकीत दुष्काळावर आणि SIR संदर्भात चर्चा झाली.  मला त्यात तथ्य काही वाटत नाही.  साहेबांचा 87 वा वाढदिवस आहे. योगायोगाने ती तारीख जवळ आली आहे, यामुळे काही घटना घडणार आहेत का ? अशा चर्चा आहेत. 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस आहे तेव्हा राष्ट्रवादीचे विलीनीकर होणार अशी चर्चा आहे. या चर्चेवर सुनील तटकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Indian Politics