राष्ट्रवादी विलिनीकरण : मागील अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील बड्या नेत्यांकडूनही विलिनीकरणासंदर्भात सकारात्मक विधानं केली जात आहेत. त्यातच आता विलिनीकरणासाठी भाजपच्या ग्रीन सिग्नलची प्रतिक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या काळात राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत निर्णय होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही विलिनीकरण न होता तिसरा गट निर्माण होऊ शकतो. बड्या मंत्र्यांच्या मोठ्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केले. विलिनीकरण न होता तिसरा गट निर्माण होईल असा दावा शिरसाटांनी केला आहे. दोन्ही गट मिळून राष्ट्रवादीचा तिसरा गट होऊ शकतो असं शिरसाटांनी म्हटल आहे. शिरसाटांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राजकीय घडामोडींना सुरुवात झाली. कोणता पक्ष कोणात विलीन होणार हे पाहायचं आहे असं विधान संजय शिरसाट यांनी केले होते.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत आता भाजपच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा असल्याचं समजत आहे. दोन्ही बाजूंचे अनेक नेते विलीनीकरणाबाबत सकारात्मक आहेत. तशी विधानंही वारंवार केली जात आहेत. पण, आता विलीनीकरणानंतर नेतृत्व, अर्थखाते कोणाकडे याबाबत चर्चेचं गु-हाळ सुरु असल्याचं समजतं आहे.
शरद पवार आणि प्रफुल पटेलांच्या रुग्णालयातील भेटीनंतर राष्ट्रवादीत विलिनीकरणाचे फटाके फूट लागलेत. दोन्ही बाजूंचे अनेक नेते विलीनीकरणाबाबत सकारात्मक असून तशी विधानंही वारंवार केली जात आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत आता भाजपच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा असल्याचं समजत आहे. याशिवाय विलीनीकरणानंतर नेतृत्व, अर्थखाते कोणाकडे? याबाबत घोडं अडल्याचं कळत आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एका गटाचा विलिनीकरणाला विरोध असल्याचं समजत आहे. देशात भाजपविरोधी वातावरण असून भविष्यात हा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजप सोबत जाणे योग्य राहील का? अशी भूमिका पवार गटातील काही नेत्यांनी घेतली. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनौपचारीक गप्पांमध्ये मोठं भाष्य केले आहे.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत शरद पवारांनी संकेत दिलेले नाहीत असं म्हणत खासदार संजय राऊतांनी विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. तर, संजय राऊतांनी पवारांचे प्रवक्ते होऊ नये असं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटल आहे.